Borim Temple Theft: फोंड्यात चोऱ्यांचे सत्र सुरुच! बोरी गोपाळकृष्ण मंदिराची फंडपेटी दुसऱ्यांदा फोडली; पोलिसांसमोर आव्हान

Borim gopal krishna temple theft: महिन्याभरापूर्वीच बोरीतील एका घरात चोरट्यांनी धाडसी चोरी करण्याबरोबरच ढवळी आणि उसगावातील मंदिरातील फंडपेटी फोडली होती.
Borim gopal krishna temple theft
Borim gopal krishna temple theftDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: फोंडा पोलिस स्थानकाच्या हद्दीत सातत्याने चोरीच्या घटना होत असून रात्री देऊळवाडा - बोरीतील गोपाळकृष्ण मंदिराची फंडपेटी फोडून आतील सुमारे पाच हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यात या मंदिरातील ही चोरीची दुसरी घटना आहे.

महिन्याभरापूर्वीच बोरीतील एका घरात चोरट्यांनी धाडसी चोरी करण्याबरोबरच ढवळी आणि उसगावातील मंदिरातील फंडपेटी फोडली होती, आता महिन्यानंतर पुन्हा एकदा चोरट्यांनी डोके वर काढले आहे. चोरट्यांनी गुरुवारी साप्ताहिक उत्सवानंतर रात्री उशिरा मंदिराचा लोखंडी दरवाजा तोडून आत प्रवेश केला व मंदिराच्या गाभाऱ्यासमोरील फंडपेटी फोडली.

फंडपेटी फोडून पैसे घेऊन चोरटा तीन मिटर उंच असलेल्या कंपाऊंड भिंतीवरून उडी मारून पसार झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते. चोरट्याने चेहरा कपड्याने झाकला असल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट झाले आहे. तीन महिन्यापूर्वी मंदिराची फंडपेटी फोडल्यानंतर देवस्थान समितीने छुपे कॅमेरे बसवले होते.

Borim gopal krishna temple theft
Borim Bridge: जीवितहानी झाली की लक्ष द्यायचे, असा काही शिरस्ता आहे का? बोरी पुलाच्या कामाचे गांभीर्य..

मात्र असे असूनही चोरट्याने ही धाडसी चोरी केली आहे. सकाळी मंदिराचा दरवाजा उघडण्यासाठी आल्यावर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर फोंडा पोलिसांना या चोरीबाबत कळवण्यात आले.

Borim gopal krishna temple theft
Borim Bridge: जीवितहानी झाली की लक्ष द्यायचे, असा काही शिरस्ता आहे का? बोरी पुलाच्या कामाचे गांभीर्य..

पोलिसांनी मंदिरात येऊन चौकशी केली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, फोंडा भागात चोरट्यांचा वावर असून चोरट्यांकडून मंदिरे टार्गेट करण्यात येत असल्याचे मागच्या चोऱ्यांवरून स्पष्ट होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com