अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानच्या (Taliban) राजवटीनंतर प्रथमच अफगाणिस्तान अंडर -19 संघ (Afghan Under-19 Cricket Team) देशाबाहेर मालिका खेळणार आहे. एका अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले की, अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे सदस्य छोटी श्रुखंला खेळण्यासाठी बांगलादेशला दाखल झाला आहे. अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात आल्यानंतर परदेशात क्रिकेट खेळणारा हा पहिलाच अफगाण संघ आहे.
ते 10 ते 25 सप्टेंबर दरम्यान सिल्हेट आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर बांगलादेशच्या 19 वर्षांखालील संघाविरुद्ध पाच एकदिवसीय आणि एक चार दिवसीय सामना खेळतील. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (बीसीबी) प्रवक्ते रबिद इमाम (Rabid Imam) म्हणाले, "आठ खेळाडूंचा पहिला गट आज ढाकाला पोहोचला आहे. उर्वरित खेळाडू इतर दोन गटांमध्ये दाखल होतील." ऑगस्टच्या मध्यावर तालिबान्यांनी त्यांच्या देशाचा बराच भाग ताब्यात घेतल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट संघ एकदिवसीय श्रुखंला खेळणारा पहिला अफगाण संघ असणार आहे.
दरम्यान पुढे इमाम म्हणाले की, अफगाणिस्तानचे क्रीडापटू ढाकाला पोहोचल्यानंतर सिलहटला रवाना झाले. बीसीबीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो ढाकाच्या हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर अफगाणिस्तानचे खेळाडू लाल टी-शर्टमध्ये दिसत आहेत. फेब्रुवारी 2020 मध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर ही मालिका बांगलादेशच्या 19 वर्षांखालील क्रिकेटपटूंची पहिलीच स्पर्धात्मक श्रुखंला असणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.