T20 विश्वचषकातील (T20 World Cup) अंतिम सामना आज रंगणार आहे. @ICC/ Twitter
क्रीडा

ICC T20 World Cup: न्यूझीलंड की ऑस्ट्रेलिया कोण होणार विजेता, पहा दिग्गजांची मते

दुबईत आज (14 नोव्हेंबर) सायंकाळी 7:30 वाजता होणाऱ्या (AUS vs NZ) या फायनल सामन्याबाबत क्रिकेटच्या अनेक दिग्गज खेळाडूंनी भविष्यवाणी करताना त्यांचा आवडता संघ निवडला आहे.

दैनिक गोमन्तक

T20 विश्वचषकातील (T20 World Cup) अंतिम सामना आज रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया (Australia) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात हा सामना होणार आहे. या दोन पैकी एका संघाचे T20 विश्वचषक विजेतेपदाचे स्वप्न आज साकार होणार आहे. ऑस्ट्रेलियाने ब गटातील सर्वात बलाढ्य संघ पाकिस्तानचा पराभव करून अंतिम फेरी गाठली, तर न्यूझीलंडने इंग्लंडचा पराभव करत अंतिम फेरी धडक मारली आहे. दुबईत आज (14 नोव्हेंबर) सायंकाळी 7:30 वाजता होणाऱ्या (AUS विरुद्ध NZ) या फायनल सामन्याबाबत क्रिकेटच्या अनेक दिग्गज खेळाडूंनी भविष्यवाणी करताना त्यांचा आवडता संघ निवडला आहे.

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 14 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये कांगारू वरचष्मा राहिला आहे. यापैकी ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक 9 सामने जिंकले, तर न्यूझीलंडला केवळ 5 सामन्यात विजय मिळविता आला आहे.

सौरव गांगुलीने एका पुस्तक स्वाक्षरी समारंभात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना चांगले संघ म्हणून वर्णन करत, न्यूझीलंडला मजबूत फेव्हरेट म्हणले आहे. ते म्हणाला, न्यूझीलंडने नुकतेच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले आहे.

वसीम अक्रमने ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला T20 विश्वचषकाचे दावेदार म्हटले आहे. ते म्हणाले, पाकिस्तान संघाचा पराभव करून ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत पोहोचला आहे. माझ्या ऑस्ट्रेलियाच विश्वचषक जिंकेल.

इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने बेटवेसाठी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, इतिहास साक्षी आहे, जेव्हा हे दोन संघ महत्त्वाच्या स्पर्धेत ज्या वेळी अंतिम फेरीत खेळले तेव्हा ऑस्ट्रेलियाचाच वरचष्मा राहिला आहे. यावेळी पीटरसनने 2015 च्या एकदिवसीय विश्वचषक फायनलची आठवण करून दिली. आणि म्हणले, “रविवारी जेव्हा ऑस्ट्रेलिया विजेतेपद पटकावले तेव्हा मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही.

ऑस्ट्रेलियाचे कौतुक करताना पीटरसनने लिहिले की, "ऑस्ट्रेलियाचा संघ ‘डू ऑर डाय’ सामन्यात अधिक चांगले करतो. तो या मोठ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला असेल, तर तो आता अतिरिक्त प्रयत्न करेल.

आपल्या सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करताना ब्रायन लारा म्हणाला, दोन्ही संघ खूप चांगले आहेत. म्हणूनच ते अंतिम फेरीत पोहोचले आहेत. दोघेही पहिली ट्रॉफी जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने चांगली कामगिरी केली आहे. माझा अंदाज आहे की, न्यूझीलंड आज विश्वचषक फायनल जिंकेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

SCROLL FOR NEXT