T20 World Cup 2021 मधून पाकिस्तान बाहेर, ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये !

या विजयासह ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरी गाठली असून पाकिस्तान (Pakistan) स्पर्धेतून बाहेर झाला आहे. मार्कस स्टॉइनिस आणि मॅथ्यू वेडच्या फटकेबाजीने पाकिस्तानच्या हातून सामना हिरावून घेतला.
Matthew Head
Matthew HeadDainik Gomantak

T20 विश्वचषक 2021 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्तानने दिलेले 177 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने एक षटक राखून पूर्ण केले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरी गाठली असून पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर झाला आहे. मार्कस स्टॉइनिस आणि मॅथ्यू वेडच्या फटकेबाजीने पाकिस्तानच्या हातून सामना हिरावून घेतला. मॅथ्यू हेडने (Matthew Head) 17 चेंडूत नाबाद 41 धावा केल्या, तर स्टॉइनिसने 31 चेंडूत नाबाद 40 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला शेवटच्या 2 षटकात 20 धावांची गरज होती, परंतु मॅथ्यू वेडने शाहीन आफ्रिदीच्या षटकात सलग तीन षटकार मारुन कांगारुना विजय मिळवून दिला.

Matthew Head
T20 World Cup 2021: मोहम्मद रिझवानने 1000 धावा करत इतिहास रचला

यापूर्वी पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 षटकांत 176 धावा केल्या होत्या. फखर जमान आणि मोहम्मद रिझवान या दोघांनीही अर्धशतके झळकावली. रिझवानने 52 चेंडूत 67 तर फखर जमानने 32 चेंडूत 55 धावा केल्या. बाबर आझमनेही ३९ धावांची खेळी खेळली पण शेवटी हे योगदान व्यर्थ गेले. गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, हसन अलीने अवघ्या 26 धावांत 4 बळी घेतले आणि त्याला सामन्यातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून निवडण्यात आले. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झाम्पाने अवघ्या 22 धावांत 1 बळी घेतला.

हसन अलीने झेल सोडला, पाकिस्तानने सामना गमावला

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने मॅथ्यू वेडचा झेल चुकणे संघाच्या पराभवाचा टर्निंग पॉइंट सांगितला. 19 व्या षटकात हसन अलीने शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर मॅथ्यू वेडचा सोपा झेल सोडला, त्यानंतर डावखुरा फलंदाज शाहीन आफ्रिदीच्या 3 चेंडूत सलग 3 षटकार ठोकून पाकिस्तानकडून सामना हिसकावून घेतला. 15 षटकांपर्यंत सामना ऑस्ट्रेलियाच्या हाताबाहेर होता आणि पाकिस्तान सहज विजयाकडे वाटचाल करत होता. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने 15 षटकात 5 बाद 115 धावा केल्या होत्या आणि 5 षटकात विजयासाठी 62 धावा हव्या होत्या, परंतु पाकिस्तानची खराब गोलंदाजी आणि स्टोनिस-वेडच्या वेगवान फलंदाजीमुळे कांगारुना विजय मिळवून दिला. अखेरच्या 4 षटकात ऑस्ट्रेलियाने 61 धावा केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com