T20 World Cup 2021: 'या' 5 चुकांमुळे टीम इंडियाचे आव्हान संपुष्टात

रोहित शर्मा (Rohit Sharma), केएल राहुल, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह यांसारख्या दिग्गजांचा संघ प्रत्येक प्रतिस्पर्ध्यासाठी मोठा धोका होता.
Indian Team
Indian TeamDainik Gomantak
Published on
Updated on

T20 World Cup 2021चे वेळापत्रक जाहीर झाले, तेव्हा या स्पर्धेचा सर्वात मोठा दावेदार टीम इंडिया होती. विराट कोहली, रोहित शर्मा (Rohit Sharma), केएल राहुल (KL Rahul), ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह यांसारख्या दिग्गजांचा संघ प्रत्येक प्रतिस्पर्ध्यासाठी मोठा धोका होता. परंतु भारतीय संघाने (Indian Team) टी-20 विश्वचषकात अत्यंत खराब कामगिरी केली आणि हा संघ सुपर-12 फेरीतूनच बाहेर पडला. अफगाणिस्तानवर (Afghanistan) न्यूझीलंडच्या (New Zealand) विजयासह, टी -20 विश्वचषक 2021 च्या उपांत्य फेरीत पोहोचणारा संघ निश्चित झाला ज्यामध्ये भारताचे नाव नाही. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांनी उपांत्य फेरीत धडक मारली असून 2007 मध्ये टी-20 चॅम्पियन बनलेल्या टीम इंडियाचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, या स्पर्धेत टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्या सामन्यात भारतीय संघ पाकिस्तानकडून 10 विकेटने हरला होता. यानंतर न्यूझीलंडनेही त्याला एकतर्फी 8 गडी राखून पराभूत केले. हे दोन पराभव टीम इंडियासाठी मोठा झटका ठरले. मात्र पुढील दोन सामने जिंकूनही टीम इंडियाच्या पदरी निराशाच पडली. चला तर मग, या स्पर्धेत बलाढ्य टीम इंडियाने अशा कोणत्या चुका केल्या, ज्यामुळे त्यांचा रस्ता चुकला ते समजून घेऊया...

Indian Team
T20 World Cup 2021: रबाडाच्या हॅट्ट्रिकने आफ्रिका जिंकली, तरी ऑस्ट्रेलियाच क्लालिफाय

टीम इंडियाच्या अपयशाचे पहिले मोठे कारण

इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेपर्यंत टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन अप्रतिम दिसत होती. परंतु आयपीएल 2021 च्या अखेरीस सर्वकाही बदलले. हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचा समतोल बिघडला. टीमने त्याला स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून संधी दिली आणि पाकिस्तानविरुद्ध टीम इंडिया केवळ 5 गोलंदाजांसह मैदानात उतरली. पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला एकही विकेट घेता आली नाही. पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघ अचानक खूपच कमकुवत दिसू लागला.

टीम इंडियाच्या अपयशाचे दुसरे मोठे कारण

रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुलसारख्या फलंदाजांनी सुसज्ज असलेल्या टीम इंडियाने सराव सामन्यांमध्ये अप्रतिम फलंदाजी केली. मात्र लीगचा टप्पा सुरु होताच सगळे फ्लॉप झाले. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध भारताची टॉप ऑर्डर खराब झाली. इतकंच नाही तर पाकिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास इतका डळमळला की, रोहित शर्माला सलामीऐवजी तिसऱ्या क्रमांकावर उतरविण्यात आले. दुबईच्या खेळपट्टीवर फलंदाजांना पुरेशी धावसंख्या उभारता आली नाही. तर दुसरीकडे गोलंदाजांना विकेटसाठी झगडावं लागलं.

Indian Team
T20 World Cup 2021: KL राहुलचे विक्रमी अर्धशतक पाहून गर्लफ्रेंड अथिया ‘घायल’

टीम इंडियाच्या अपयशाचे तिसरे मोठे कारण

भारतीय संघाच्या अपयशाचे तिसरे सर्वात मोठे कारण म्हणजे गोलंदाजांची चुकीची निवड. टीम इंडिया एकेकाळी युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या दोन फिरकीपटूंसोबत मैदानात उतरत असे, परंतु या संपूर्ण स्पर्धेत विराट आणि कंपनीने रिस्ट स्पिनरला प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवलेच नाही. प्रथम, युझवेंद्र चहलच्या अनुभवावर राहुल चहरला प्राधान्य देण्यात आले. मात्र त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधीच देण्यात आली नाही. त्यामुळे पहिल्या दोन सामन्यांच्या मधल्या षटकांमध्ये टीम इंडियाला विकेटही काढता आल्या नाहीत.

टीम इंडियाच्या अपयशाचे चौथे मोठे कारण

नाणेफेक हेही टीम इंडियाच्या पराभवाचे चौथे प्रमुख कारण होते. दुबईतील दिवस-रात्रीच्या सामन्यांमध्ये, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला धावा करण्यात नेहमीच अडचणी येत होत्या. पहिल्या दोन मोठ्या सामन्यांमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक गमावली होती. रात्री पडलेल्या दवामुळे पाकिस्तानने 152 धावांचे लक्ष्य सहज गाठले. तर न्यूझीलंडनेही 111 धावा आरामात केल्या.

Indian Team
T20 World Cup 2021:भारत सेमी फायनलमध्ये? हे असणार एंट्रीचं गणित

टीम इंडियाच्या अपयशाचे पाचवे मोठे कारण

बायो-बबलमधील थकवा हे देखील टीम इंडियाच्या पराभवाचे प्रमुख कारण होते. टीम इंडियाचे खेळाडू इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळल्यानंतर लगेचच यूएईला पोहोचले. आणि आयपीएल 2021 खेळायला सुरुवात केली. आयपीएल 2021 नंतर लगेचच टी20 विश्वचषक 2021 सुरु झाला. बायो-बबलमधील थकवा आणि जास्त क्रिकेट खेळणे खेळाडूंना जड गेले. विशेष म्हणजे त्याचा उल्लेख खुद्द कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाने केलाही होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com