Surayakumar Yadav Dainik Gomantak
क्रीडा

IND vs PAK: "त्यांनी नकार दिलाय, आम्ही नाही''! पाकड्यांच्या बहिष्कार नाट्यावर सूर्याचा रुबाब; वर्ल्ड कपच्या वादावर भारताची भूमिका स्पष्ट

Surayakumar Yadav Responds: पाकिस्तानने या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली असली, तरी भारताच्या तयारीवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही.

Manish Jadhav

T20 World Cup 2026: भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली 7 फेब्रुवारीपासून टी-20 वर्ल्ड कप 2026 ला सुरुवात होत आहे. या मोठ्या स्पर्धेपूर्वी 5 फेब्रुवारी रोजी सर्व देशांच्या कर्णधारांची अधिकृत पत्रकार परिषद पार पडली. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने 15 फेब्रुवारीला कोलंबोमध्ये पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या हाय-व्होल्टेज सामन्याबाबत भारताची भूमिका अत्यंत स्पष्ट शब्दांत मांडली.

पाकिस्तानने या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली असली, तरी भारताच्या (India) तयारीवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. सूर्याने सांगितले केले की, "आम्ही स्पष्ट आहोत. आम्ही पाकिस्तानविरुद्ध खेळायला कधीच नकार दिलेला नाही, तर त्यांनीच तशी भूमिका घेतली आहे. आमचे नियोजन ठरलेले आहे, विमान तिकिटे बुक असून आम्ही कोलंबोला जाणार आहोत."

सूर्याने पुढे सांगितले की, भारतीय संघ वेळापत्रकानुसार आधी युएसए (USA) आणि नंतर नेदरलँड्सविरुद्ध खेळेल आणि त्यानंतर कोलंबोला रवाना होईल. पाकिस्तानच्या निर्णयांवर किंवा त्यांच्या बहिष्काराच्या भूमिकेवर भारताचे कोणतेही नियंत्रण नाही. सूर्याच्या म्हणण्यानुसार, आशिया चषकातही दोन्ही संघ भिडले होते आणि आताही जर 15 फेब्रुवारीला सामना झाला, तर भारतीय संघ मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे.

याव्यतिरिक्त, त्याने भारतीय ड्रेसिंग रुममधील सकारात्मक वातावरणाबद्दलही भाष्य केले. संघात वैयक्तिक विक्रमांपेक्षा सांघिक कामगिरीला महत्त्व दिले जाते, असे सांगताना त्याने इशान किशनच्या शतकाचे उदाहरण दिले. मैदानावरील खेळाडूंना त्यांच्या शैलीनुसार खेळण्याची पूर्ण मोकळीक असल्याचे त्याने नमूद केले.

दुसरीकडे, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही या प्रकरणावर आपली बाजू मांडली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तानच्या बहिष्काराबाबत भारताला काहीही भाष्य करायचे नाही. हा सर्वस्वी आयसीसीचा (ICC) विषय असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद जो काही निर्णय घेईल, त्याचे भारत पालन करेल. दरम्यान, पाकिस्तान सरकारने आपल्या संघाला भारताशी न खेळण्याचे आदेश दिले असले, तरी अद्याप पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीला अधिकृतपणे काहीही कळवलेले नाही. जर पाकिस्तानने या सामन्यावर बहिष्कार टाकला, तर आयसीसीच्या नियमांनुसार त्यांच्यावर मोठा दंड किंवा बंदीची कारवाई होऊ शकते. पाकिस्तानचा संघ सध्या श्रीलंकेत दाखल झाला असून कोलंबोमधील मैदानावर त्यांचे सर्व सामने नियोजित आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

Goa Politics: गोव्यात सरकारी कार्यक्रमांच्या नावाखाली जनतेच्या पैशांची लूट? क्रीडा खात्याच्या संचालकांना घेतलं फैलावर; काँग्रेस आक्रमक

Goa Pocso Case: मुलीने कोर्टात फिरवली साक्ष! रागाच्या भरात वडिलांविरोधात खोटी तक्रार केली; 38 वर्षीय नेपाळी नागरिकाची निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT