IND VS PAK: ब्रॉडकास्टर्सकडून पाकवर कायदेशीर कारवाई? आर्थिक कोंडीबरोबर न्यायालयीन कारवाई होण्याची शक्यता

JioStar Legal Action Against PCB: भारताविरुद्धचा सामना न खेळल्यास स्पर्धेचे ब्रॉडकास्टर्स जिओस्टार कायदेशीर कारवाई करेल, असे इशारा आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट मंडळाला दिला.
JioStar legal action against PCB
JioStar legal action against PCBDainik Gomantak
Published on
Updated on

IND vs PAK Match Update : टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील १५ फेब्रुवारीला होणारा भारताविरुद्धचा सामना न खेळल्यास स्पर्धेचे ब्रॉडकास्टर्स जिओस्टार कायदेशीर कारवाई करेल, असे इशारा आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट मंडळाला दिला आहे. ही माहिती पाक मंडळानेच उघड केली आहे.

विश्ककरंडक स्पर्धेतील सर्वात चर्चेत असलेली भारताविरुद्धची कोलंबोत नियोजित असलेली लढत आमचा संघ खेळणार नाही, असे पाकिस्तान सरकारने एक्सद्वारे जाहीर केले; परंतु पाकिस्तान क्रिकेट मंडळाने आयसीसीला अधिकृतपणे अद्याप कळवलेले नाही.

JioStar legal action against PCB
Goa Dangerous Dog Policy: 'हिंसक श्‍वान प्रतिबंध' धोरण कागदावरच, एका वर्षानंतरही अंमलबजावणीबाबत उदासीनता कायम

पाकिस्तान क्रिकेटची पूर्णतः आर्थिक कोंडी करण्याची तयारी आयसीसीने केली आहे. आयसीसीकडून प्रत्येक संलग्न देशांतील संघटनांना ब्रॉडकास्टर्सकडून येणारा वार्षिक महसूल वाटा दिला जातो. पाक संघटनेचे पूर्ण ३.५ कोटी रुपये रोखले जाण्याची शक्यता आहे.

पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना माहिती देण्याअगोदर कायद्याचा सल्ला घेतला असेल, असे सांगण्यात येत असले तरी पाक मंडळाला भारताविरुद्धची लढत ठोस कारणाशिवाय टाळल्यास मोठ्या परिणामांचा सामना करावा लागणार आहे. केवळ आर्थिक नुकसानीचा त्यांना सामना करावा लागेलच, त्याचबरोबर ब्रॉडकास्टर्सकडून कायद्याचाही बडगा उगारला जाईल. आयसीसीच्या वादविवाद निवारण समितीकडे हे प्रकरण जाऊ शकेल, असे पाक मंडळाच्या सूत्रांनी पीटीआयला सांगितले.

JioStar legal action against PCB
Goa Traffic Rule: ट्रिपल सीट, ओव्हरस्पीड आता महागात पडणार! 'दक्षिणे'त 14 ठिकाणी 'AI कॅमेऱ्यां'चा पहारा, नियम मोडल्यास 'दंड' थेट मोबाईलवर

स्पर्धेतले स्वतःचे सर्व सामने पाकिस्तान श्रीलंकेत खेळणार आहे. आपले सामने इतर देशात खेळावावे, ही त्यांची मागणी आयसीसीने पूर्ण केलेली असतानाही कोलंबोत होणारी भारताविरुद्धची लढत टाळणे योग्य ठरणार नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. आपली भूमिका पटवून देण्यासाठी आणि इतर देशांच्या मंडळांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी पाक मंडळाने इतरांशी संपर्क साधला; पण कोणीही त्यांचे समर्थन केले नसल्याचे समजते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com