Pakistan Team Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ जाहीर, शाहीन आफ्रिदीचे पुनरागमन

Pakistan Team: ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ICC पुरुष T20 विश्वचषक 2022 साठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) ने आज राष्ट्रीय संघाची घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

T20 World Cup: ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ICC पुरुष T20 विश्वचषक 2022 साठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) ने आज राष्ट्रीय संघाची घोषणा केली आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली बोर्डाने 2022 च्या T20 विश्वचषकासाठी 15 जणांचा संघ जाहीर केला आहे. या संघात वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीचाही समावेश आहे, जो दुखापतीमुळे 2022 आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडला होता. याशिवाय देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या शान मसूदलाही संघात संधी देण्यात आली आहे.

दरम्यान, शान मसूदचे अद्याप टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण झालेले नाही. दुसरीकडे, हैदर अलीची संघात निवड झाली आहे, जो डिसेंबर 2021 मध्ये संघासाठी शेवटचा सामना खेळला होता. मात्र, फखर जमानला राखीव खेळाडूंसोबत ठेवण्यात आले आहे. शान मसूदला टी20 ब्लास्टमधील त्याच्या कामगिरीचे बक्षीस मिळाले असून तो पहिल्यांदाच पाकिस्तानकडून (Pakistan) टी-20 सामन्यात खेळणार आहे. यापूर्वी त्याने एकदिवसीय आणि कसोटीत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे.

तसेच, फखर जमानच्या जागी हैदर अलीला संघात स्थान मिळाले आहे. मागील काही दिवसात फखर दुखापतीने त्रस्त असल्याच्या बातम्या आल्या होत्या. फखरने सात T20 सामन्यांमध्ये 13.71 च्या सरासरीने 96 धावा काढल्या आहेत. शाहीन पुढील महिन्यात होणाऱ्या स्पर्धेपूर्वी पुन्हा गोलंदाजी सुरु करेल. हाच संघ T20 विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडमध्ये (New Zealand) तिरंगी मालिका खेळणार आहे, ज्यामध्ये बांगलादेशचाही (Bangladesh) समावेश आहे.

पाकिस्तान टी-20 विश्वचषक संघ: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, उस्मान कादिर

राखीव: फखर जमान, मोहम्मद हरीस, शाहनवाज दहनी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ro Ro Ferryboat: गोव्यात आणखी एका मार्गावर होणार 'रो रो फेरी' सुरु, किती असणार क्षमता? कधी होणार सुरु? जाणून घ्या..

''बान तू सायबा'', भूतनाथाला रानातून परत आणण्यासाठी भाविक जमणार; पेडण्यात भरणार 'पुनव उत्सव'

U19 Goa Cricket Team: गोवा संघाचा लागणार कस! विनू मांकड करंडक होणार सुरु; युवा क्रिकेटपटू चमक दाखवण्यासाठी सज्ज

Mapusa Market: पोर्तुगीज काळात उभारलेला, 1960 साली बांधलेला, आशियातील पहिला नियोजनबद्ध बाजार

IIT Project Goa: उद्या गोव्याच्या हातून 'आयआयटी' गेली तर..?

SCROLL FOR NEXT