ICC T20 World Cup: ऋषभ पंतला ओपनिंग करण्याची संधी द्यावी, वसीम जाफरचा रोहितला सल्ला

Rishabh Pant: आयसीसी T20 विश्वचषकासाठी सोमवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.
Rishabh Pant
Rishabh PantDainik Gomantak
Published on
Updated on

ICC T20 World Cup: आयसीसी T20 विश्वचषकासाठी सोमवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. आगामी स्पर्धेत लक्ष्य निश्चित करताना भारताने कशी फलंदाजी करावी यावर बरीच चर्चा होत असून, अनेक माजी खेळाडू टीम इंडियाच्या फलंदाजीच्या क्रमावारीवर आपली मते मांडत आहेत. या चर्चेत आता माजी सलामीवीर वसीम जाफरही सामील झाला आहे. जाफरने ट्विट करत कर्णधार रोहितला मोलाचा सल्ला दिला आहे. रोहितने ऋषभ पंतला ओपनिंग करण्याची संधी द्यावी, असे म्हटले आहे. जाफरने माजी कर्णधार एमएस धोनीचे उदाहरण दिले, ज्याने 2013 मध्ये रोहितला ओपनिंग करण्याची संधी देऊन आपल्या कारकिर्दीचा मार्ग बदलला होता.

दरम्यान, जाफरने ट्विटमध्ये म्हटले की, “मला अजूनही वाटते की, टी-20 मध्ये आपण पंतचा सर्वोत्तम खेळ पाहू शकतो. रोहित नंबर चार वर फलंदाजी करण्यासाठी योग्य आहे. एमएसने 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी (Champions Trophy) रोहितवर सट्टा खेळला होता. रोहितसाठी हीच योग्य वेळ आहे की, पंतला फलंदाजीसाठी आगोदर येण्याची संधी द्यावी. माझ्यासाठी केएल, पंत, विराट, रोहित आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हे टॉप-5 मध्ये असतील.''

Rishabh Pant
T20 World Cup 2022: भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने; ICC ने निश्चित केली तारीख

असा असेल विश्वचषकासाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

राखीव खेळाडू

मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com