पणजी: आजारी विश्वंबर काहलोन याच्या जागी अष्टपैलू अमोघ देसाई (Amogh Desai) याची गोव्याच्या (Goa) ट्वेन्टी-२० क्रिकेट संघात निवड झाली आहे. सय्यद मुश्ताक अली करंडक (Syed Mushtaq Ali Trophy) क्रिकेट स्पर्धेतील एलिट अ गटात गोव्याचा समावेश असून सामने लखनौ येथे होतील.
गोवा क्रिकेट असोसिएशनने (Goa Cricket Association) दिलेल्या माहितीनुसार, विश्वंबर ‘चिकुनगुनिया’ने आजारी आहे. त्यामुळे अगोदर जाहीर करण्यात आलेल्या वीस सदस्यीय संघात एकमेव बदल करण्यात आला आहे. गोव्याचा संघ स्पर्धेतील विलगीकरणासाठी २७ रोजी रवाना होईल.
अमोघ २९ वर्षांचा असून यापूर्वी ३५ ट्वेन्टी-२० सामने खेळला आहे. त्याने ४२३ धावा केल्या असून नऊ गडी बाद केले आहेत. गतमोसमातील या स्पर्धेत तो खेळला होता. फलंदाजीत त्याला सूर गवसला नव्हता. ११.५०च्या सरासरीने फक्त ४६ धावा केल्या होत्या.
दरम्यान, गोव्याच्या सीनियर महिला एकदिवसीय क्रिकेट संघातही एक बदल करण्यात आला आहे. सावली कोळंबकर हिची १९ वर्षांखालील मुलींच्या चॅलेंजर करंडक स्पर्धेसाठी निवड झाली आहे, त्यामुळे तिच्या जागी सयानी राऊत देसाई हिची निवड करण्यात आली. सीनियर महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा एलिट ड गटात समावेश असून सामने ३१ पासून आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम व विझियानगरम येथे खेळले जातील.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.