Suryakumar Yadav wants to learn 'no-look' shot from Dewald Brevis Dainik Gomantak
क्रीडा

Suryakumar Yadav: भारताच्या 'मिस्टर 360'ला 'बेबी एबी'कडून शिकायचाय 'तो' स्पेशल शॉट, पाहा व्हिडिओ

सूर्यकुमारने डेवाल्ड ब्रेविसकडून त्याचा एक खास शॉट शिकायचा आहे.

Pranali Kodre

Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादव सध्या त्याच्या चौफेर फटकेबाजीमुळे चर्चेत येत आहे. त्याला आता भारताचा 'मिस्टर 360' म्हणूनही ओळखले जाते. पण असे असले तरी त्याला दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविसकडून एक शॉट शिकायचा आहे. मुंबई इंडियन्सने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये याबद्दल खुलासा झाला आहे.

सूर्यकुमार आणि ब्रेविस हे दोघेही आयपीएल 2022 हंगामात एकत्र खेळले होते. आता आगामी आयपीएल हंगामातही ते एकत्र खेळणार आहेत. या हंगामादरम्यान सूर्यकुमारला ब्रेविसकडून त्याचा नो-लूक शॉट शिकायचा आहे.

(Suryakumar Yadav wants to learn 'no-look' shot from Dewald Brevis)

मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ब्रेविसशी बोलताना सूर्यकुमार म्हणाला, 'मी कधीकधी तुला फक्त कॉपी करण्याचा प्रयत्न करतो. तो ज्याप्रकारे फलंदाजी करतो, तू मला एक गोष्ट शिकव. तू तो नो-लूक शॉट, नो-लूक सिक्स कसा खेळतो? मला ते तुझ्याकडून शिकायचे आहे.'

यावर बेबी एबी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रेविसने उत्तर दिले की 'हा माझ्यासाठी सन्मान असेल. पण मलाही तुझ्याकडून खूप शॉट्स शिकायला आवडतील. गमतीची गोष्ट म्हणजे माझा नो-लूक शॉट आपोआप खेळला जातो. हे विचित्र आणि पण मला माहित नाही, हे कसं होतं.'

ब्रेविसने काही दिवसांपूर्वीच सीएसए टी20 चॅलेंज स्पर्धेतील एका सामन्यात 57 चेंडूत 162 धावांची खेळी केली होती. या खेळीबद्दलही सूर्यकुमारने त्याचे कौतुक केले आहे.

सूर्यकुमार म्हणाला, 'मी तुला अखेरच्या वेळी पाहिले, तेव्हा तू एका टी20 सामन्यांत काहीतरी 50-55 चेंडूत 160-165 धावा केल्या होत्या. त्यामुळे आता वनडेत जर तुला 100 चेंडू खेळायला मिळाले, तर तू त्रिशतक करू शकतो.'

यावर ब्रेविस म्हणाला, 'तो माझ्यासाठी नेहमीसारखाच साधारण दिवस होता. ती खेळी तशीच झाली. मला ती खेळी करताना कळालंही नाही की त्यावेळी मी काय करत होतो. त्यावेळी सर्वकाही आपोआप होत गेले. एकीकडे मी नॉ-स्ट्रायकरच्या फलंदाजाला हेही सांगत होतो, की मी वाटते की प्रत्येक चेंडूवर षटकार मारू शकतो.'

'मला माहित नाही, पण ती खेळी आपोआप झाली. ती खेळी खूप खास होती. पण मला हे तुला सांगावच लागेल की तू जे मिळवलं आहेस, ते खूप शानदार आहे. तू आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील अव्वल क्रमांकाचा फलंदाज झालास, त्याबद्दल अभिनंदन.'

सूर्यकुमार सध्या आयसीसी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा आणि सिंधुदुर्ग संबंध अधिक दृढ होणार, तवडकरांनी घेतली नारायण राणेंची भेट; विकासावर केली चर्चा!

"घे रे पातोळ्यो खाया सगळेजाण" मुख्यमंत्र्यांना 'खाऊचा डब्बा' देणाऱ्या चिमुकलीचा Video Viral

IND vs ENG: विकेट मिळाली, पण एक चूक झाली! प्रसिद्ध कृष्णाचा विकेटचा आनंद क्षणातच मावळला; काय झालं नेमकं? पाहा व्हिडिओ

Goa Politics: विरोधकांचे मुद्दे खोडता येतनसल्याने सत्ताधाऱ्यांचा धुडगूस; कार्लुस फेरेरा

Lucky Zodiac Signs: 4 ऑगस्टचा सोमवार खास! 5 भाग्यवान राशींचे नशिब उजळणार; होणार लक्ष्मीचा कृपावर्षाव

SCROLL FOR NEXT