SuryaKumar Yadav Batting: भारतीय संघाने तिसऱ्या टी-20 सामन्यात श्रीलंकेचा 91 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने मालिका 2-1 ने जिंकली. भारताकडून सूर्यकुमार यादवने आपल्या तुफानी फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. त्याच्यामुळेच टीम इंडियाला दुसरा सामना जिंकता आला. श्रीलंकेविरुद्ध मोठी खेळी खेळून सूर्यकुमार यादवने 3 मोठे विक्रम आपल्या नावावर केले. त्याच्याबद्दल जाणून घेऊया...
श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. जेव्हा ईशान किशन लवकर आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) वेगवान फलंदाजी करत 51 चेंडूत 9 लांब षटकारांसह 112 धावा केल्या. त्याने तुफान फटकेबाजी केली. सूर्याची फटकेबाजी पाहून श्रीलंकेच्या गोलंदाजांचीही पळताभुई थोडी झाली.
सूर्यकुमार यादवच्या नावावर आता टी-20 क्रिकेटमध्ये 3 शतके आहेत. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू आहे. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 3 टी-20 शतके झळकावणारा तो एकमेव खेळाडू आहे. या प्रकरणात त्याने ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल, दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरसह 6 खेळाडूंना मागे सोडले आहे. सलामीनंतर फलंदाजी करताना प्रत्येकाने 2-2 शतके झळकावली आहेत.
सूर्यकुमार यादवने श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) मोठी खेळी खेळताच T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1500 धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने केवळ 843 चेंडूत 1500 धावा केल्या आहेत, जे सर्वात वेगवान आहे. दुसरीकडे, श्रीलंकेविरुद्ध मोठी खेळी खेळल्याबद्दल त्याला 'मॅन ऑफ द मॅच' चा पुरस्कारही देण्यात आला. त्याचबरोबर, सूर्यकुमार यादव आयसीसी टी-20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे आणि तो विस्फोटक फलंदाजीत माहिर खेळाडू आहे. त्याने भारतासाठी 45 सामन्यात 1578 धावा केल्या आहेत.
सूर्यकुमार यादवने श्रीलंकेविरुद्ध मोठी खेळी खेळताच T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1500 धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने केवळ 843 चेंडूत 1500 धावा केल्या आहेत, जे सर्वात वेगवान आहे. श्रीलंकेविरुद्ध मोठी खेळी खेळल्याबद्दल त्याला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार देण्यात आला. सूर्यकुमार यादव आयसीसी टी-20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे आणि तो स्फोटक फलंदाजीत माहिर खेळाडू आहे. त्याने भारतासाठी 45 सामन्यात 1578 धावा केल्या आहेत.
4 रोहित शर्मा (भारत)
3 सूर्यकुमार यादव (भारत)
3 ग्लेन मॅक्सवेल (भारत)
3 कॉलिन मुनरो (न्यूझीलंड)
35 चेंडू, रोहित शर्मा विरुद्ध श्रीलंका (2017)
45 चेंडू, सूर्यकुमार यादव विरुद्ध श्रीलंका (2023)
46 चेंडू, केएल राहुल विरुद्ध वेस्ट इंडिज (2016)
48 चेंडू, सूर्यकुमार यादव विरुद्ध इंग्लंड (2022)
49 चेंडू सूर्यकुमार यादव विरुद्ध न्यूझीलंड (2020)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.