Suryakumar Yadav Dainik Gomantak
क्रीडा

Suryakumar on Mumbai Indians: मुंबई इंडियन्सची खासियत काय, कसे बनतात सुपरस्टार? सूर्यकुमार म्हणतोय...

Video: सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्सच्या संघाबाबतची खासियत सांगितली आहे.

Pranali Kodre

Suryakumar Yadav on Mumbai Indians: सध्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सनेही चांगली कामगिरी केली आहे. दरम्यान, पहिल्या तीन संघांमध्ये जागा मिळवलेल्या मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादवनेही अनेक धमाकेदार खेळी खेळल्या. त्याने 500 हून अधिक धावाही केल्या आहेत.

दरम्यान, मुंबई इंडियन्सने प्लेऑपमध्ये जागा मिळवणे नवीन गोष्ट राहिलेली नाही. त्यांनी ५ वेळा आयपीएलचे विजेतेपदही जिंकले आहे. तसेच सूर्यकुमारलाही या फ्रँचायझीकडून खेळताना नवी ओळख मिळाली आहे. जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, ईशान किशन यांच्याप्रमाणेच सूर्यकुमारच्या कारकिर्दीतही मुंबई इंडियन्सचे योगदान मोठे राहिले आहे.

आता याबद्दल सूर्यकुमारने जिओ सिनेमाशी बोलताला भाष्य केले आहे. त्याने सांगितले आहे की मुंबई इंडियन्स संघ खेळाडूंना सुपरस्टार कसा बनवतो आणि या संघाची विशेषता काय आहे. सूर्यकुमारने सांगितले आहे की या संघात आपलेपणा वाटतो. तसेच संघ खेळाडूंवर विश्वास दाखवतो.

सूर्यकुमार म्हणाला, 'मला अजूनही लक्षात आहे की जेव्हा मी 2018 मध्ये पुन्हा मुंबई संघात आलेलो, तेव्हा लोक मला विचारायचे की कसे वाटत आहे. जे विचारायचे त्यांना मी सांगायचो की असे वाटते घरी आलो आहे. जेव्हा कोणी ऑफिसमधून काम करून घरी आल्यावर कसे वाटते, अगदी तशाच भावना मला मी पुन्हा या संघात आल्यानंतर होत्या.'

'मला नंतर वरती फलंदाजी करण्याची संधी मिळाले.मी दोन वर्षे धावा केल्या. त्यानंतर माझ्या भूमिकेत बदल झाला. मला कळाले की माझी भूमिका काय असताना आहे.'

'फ्रँचायझी जर तुमच्यावर इतका विश्वास टाकत आहे, तर मला त्याची परतफेडही केली पाहिजे. मी माझ्या संघाला वरच्या स्तरावर नेण्याचा प्रयत्व केला. मी माझ्याकडूनही सराव केला, ज्यामुळे मी संघाची आणखी चांगली साथ देऊ शकेल. म्हणजे जसे की त्यांनी दोन पावले चालावित आणि मी चार पावले. त्यानंतर मध्ये येऊन भेटणे. आमच्यातील बाँड सातत्याने घट्ट होत आहे.'

सूर्यकुमारने 2012 आयपीएलध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले होते. पण नंतर तो काही वर्षे कोलकाता नाईट रायडर्सकडूनही खेळला. पण 2018 मध्ये पु्न्हा मुंबई इंडियन्सने त्याला आपल्या संघात घेतले.

मुंबईला 6 व्या विजेतेपदाची संधी

सध्या मुंबई इंडियन्सने आयपीएल 2023 मधील एलिमिनेटर सामना जिंकत दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश केला आहे. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये त्यांचा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध होणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ रविवारी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे.

त्यामुळे जर मुंबईने अंतिम सामन्यात प्रवेश केला, तर त्यांना चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत सहाव्यांदा आयपीएल ट्रॉफी उंचावण्याची संधी असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2025: इफ्फीत 'फॅशन शो'मधून हस्तकलेचा ग्लॅमरस प्रचार! महाराष्ट्रीयन अभिनेत्री सायली पाटीलसह दिग्गज मॉडेल्स उतरल्या रॅम्पवर

Baina Robbery Case: पोलिसांच्या अकार्यक्षमतेची लक्तरे, 6 दिवस उलटूनही बायणा येथील सशस्त्र दरोड्याचा तपास लागेना

Horoscope: तणाव कमी होऊन मन शांत होईल, नोकरीत बदल होणार; वाचा काय सांगतंय तुमचं भविष्य?

जाहिराती थांबवल्या, कार्यक्रमही रद्द! गोवा पोलिसांच्या निर्देशानंतर 'टेल्स ऑफ कामसूत्रा'वर पडदा; आयोजकांनी व्यक्त केली दिलगिरी

Delhi Red Fort Blast: 2023 पासून दिल्ली 'टार्गेट'वर! बॉम्बस्फोटाची तयारी 2 वर्षांपासून सुरू होती; धक्कादायक खुलासा समोर

SCROLL FOR NEXT