Suryakumar Yadav Dainik Gomantak
क्रीडा

Suryakumar Yadav: मौका, मौका ! मुंबईचा सूर्या पाकच्या बाबरला देणार मात

Team India: स्टार फलंदाज सूर्यकमार यादव त्याच्या दमदार कामगिरीमुळे व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा महत्त्वाचा सदस्य बनला आहे.

दैनिक गोमन्तक

Suryakumar Yadav: स्टार फलंदाज सूर्यकमार यादव त्याच्या दमदार कामगिरीमुळे व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा महत्त्वाचा सदस्य बनला आहे. सूर्यकुमारला आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्यासाठी थोडी प्रतिक्षा करावी लागली. मात्र आता संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एकदाही सूर्यकुमारने मागे वळून पाहिले नाही. संघाला अनेक सामने जिंकून देण्यात त्याचा मोलाचा वाटा आहे. आगामी आशिया कपमध्येही सूर्यकुमार यादवकडून संघाला अशाच दमदार कामगिरीची अपेक्षा असेल.

दरम्यान, सूर्यकुमार हा टीम इंडियासाठी किती महत्त्वाचा ठरला आहे, हे त्याची कामगिरी पाहूनच कळू शकते. केवळ 23 टी-20 सामने खेळलेला सूर्यकुमार आयसीसी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचा स्ट्राईक रेट टी-20 खेळणाऱ्या इतर खेळाडूंपेक्षा चांगला आहे. T20 मध्ये त्याचा स्ट्राइक रेट 175.45 आहे.

दुसरीकडे, तो आता यूएईमध्ये होणाऱ्या आशिया कप स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. यादवला पाकिस्तानचा (Pakistan) कर्णधार बाबर आझमला मागे टाकून जगातील नंबर वन टी-20 फलंदाज बनण्याची संधी आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) हा टी-20 मधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. तो ICC T20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत 818 रेटिंगसह अव्वल फलंदाज आहे, तर भारताच्या सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) 805 रेटिंगसह आगामी आशिया कपमध्ये बाबरला मागे टाकण्याची संधी असेल.

तसेच, गेल्या महिन्यातच सूर्यकुमारने टी-20 मध्ये मोठी कामगिरी केली होती. केएल राहुल, सुरेश रैना, दीपक हुड्डा आणि रोहित शर्मा यांच्यानंतर टी-20 मध्ये शतक करणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. नॉटिंगहॅममध्ये खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात सूर्यकुमारने ही कामगिरी केली. भारतासाठी सूर्यकुमारने 23 टी-20 सामन्यांमध्ये 175 च्या स्ट्राइक रेटने 672 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने एक शतक आणि 5 अर्धशतके झळकावली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cabinet Decisions: उज्ज्वला योजनेपासून 'संजीवनी' साखर कारखान्यापर्यंत; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय, CM सावंतांची माहिती

Military Plane Crash: लँडिंग स्ट्रिप नसताना पत्करला इमर्जन्सी लँडिंगचा धोका; भीषण विमान अपघातात 14 जणांचा जागीच मृत्यू VIDEO

Goa Water Storage: धरणे तुडुंब; साळावली-आमठाणे शंभर टक्के, बहुतांश धरणांत 90 टक्क्यांहून अधिक साठा; चापोलीत केवळ 74 टक्के

टॅक्सी भाड्यात सुधारणा, किमान दर 300 रुपये; पिवळ्या-काळ्या, टुरिस्ट टॅक्सींचे दर वाढले: शनिवारपासून नव्या भाडेरचनेनुसार प्रवास

Horoscope: शनिवार 'या' राशींसाठी ठरणार लकी! वैवाहिक जीवनात फुलणार प्रेमाचे रंग; होणार मोठी भरभराट

SCROLL FOR NEXT