ICC T20 Rankings: भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव ताज्या ICC T20 क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे. तर श्रेयस अय्यरने टॉप-20 मध्ये प्रवेश करण्यासाठी मोठी झेप घेतली आहे. बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या ICC T20 क्रमवारीत, सूर्यकुमार 805 रेटिंग गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे, तर अय्यर 578 रेटिंग गुणांसह 19व्या स्थानावर पोहोचला आहे. अय्यरने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम टी-20मध्ये 40 चेंडूत 64 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सध्या अव्वल स्थानावर आहे.
दरम्यान, गोलंदाजांच्या यादीत, फिरकीपटू रवी बिश्नोई आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांनीही ताज्या टी-20 क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. 21 वर्षीय बिश्नोईने वेस्ट इंडिजविरुद्धच्या (West Indies) दोन सामन्यात सहा विकेट घेतल्या होत्या. बिश्नोई आता 44व्या स्थानावर पोहोचला आहे, तर अंतिम सामन्यात तीन विकेट घेणार्या कुलदीपने 58 स्थानांनी झेप घेत 87व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर भुवनेश्वर कुमार नवव्या स्थानावर पोहोचला आहे.
तर दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) रीझा हेंड्रिक्सने आयर्लंडविरुद्धच्या 2-0 मालिका विजयादरम्यान 74 आणि 42 च्या स्कोअरसह 13व्या स्थानावर पोहोचून T20 मध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज गोलंदाजांच्या यादीत 18 व्या स्थानावर पोहोचला आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी (क्रमांक 23) आणि न्यूझीलंडचा लॉकी फर्ग्युसन (31 क्रमांक) यांनीही क्रमवारीत आपले स्थान सुधारले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.