Sania Mirza - Shoaib Malik Dainik Gomantak
क्रीडा

Sania Mirza: 'सर्व महिलांसाठी तू...', घटस्फोटांच्या चर्चांदरम्यानच सानियासाठी पती शोएबची इमोशनल पोस्ट

सानिया मिर्झाने अखेरचा ग्रँडस्लॅम सामना खेळल्यानंतर शोएब मलिकने तिच्यासाठी भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

Pranali Kodre

Sania Mirza - Shoaib Malik: भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने शुक्रवारी ऑस्ट्रेलियन ओपन 2023 स्पर्धेत ग्रँडस्लॅम कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळला. त्यानंतर तिचा पती आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकने तिच्यासाठी एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेतही आहे.

शुक्रवारी सानियाने भारतीय टेनिसपटू रोहन बोपन्नाच्या साथीत ऑस्ट्रेलियन ओपन 2023 स्पर्धेतील मिश्र दुहेरीचा अंतिम सामना खेळला. या सामन्यात सानिया आणि बोपन्ना जोडीला ब्राझीलच्या ल्युसा स्टेफानी आणि राफेल मातोस या जोडीने 6-7 (2-6), 2-6 अशा फरकाने पराभूत केले. त्यामुळे सानिया आणि बोपन्नाला उपविजेते ठरले.

दरम्यान, हा सानियाचा अखेरचा ग्रँडस्लॅम सामना ठरला. या सामन्यानंतर अनेकांनी सानियाचे तिच्या 18 वर्षांच्या ग्रँडस्लॅम कारकिर्दीबद्दल अभिनंदन केले. याचदरम्यान शोएबने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले.

त्याने सानियाचा फोटो पोस्ट करताना लिहिले की 'क्रीडा क्षेत्रातील सर्व महिलांसाठी तू आवश्यक असलेली आशा आहेस. तू तुझ्या कारकिर्दीत जे यश मिळवले आहे, त्याबद्दल खूप अभिमान वाटत आहे. तू अनेकांसाठी प्रेरणा आहेस, अशीच मजबूत राहा. तुझ्या अविश्वसनीय कारकिर्दीसाठी तुझे हार्दिक अभिनंदन.'

('Super proud of you', Shoaib Malik's emotional Post for Sania Mirza after her last Grand Slam Match)

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सानिया आणि शोएब यांच्या नात्यात कटूता आल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहेत. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्याही अनेकदा समोर आल्या होत्या.

अनेक रिपोर्ट्सने दावा केला होता की शोएबने एका टीव्ही शो दरम्यान सानियाची फसवणूक केली होती. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला. मात्र अद्याप या दोघांकडूनही याबाबत कोणतेही विधान समोर आलेले नाही. सानिया आणि शोएब 2010 साली विवाहबंधनात अडकले होते. त्यांना इझहान नावाचा 4 वर्षांचा मुलगाही आहे.

सानियाचे ग्रँडस्लॅममधील यश

सानियाने तिच्या कारकिर्दीत ६ ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. तिने मिश्र दुहेरीत 2009 साली ऑस्ट्रेलियन ओपन, 2012 साली फ्रेंच ओपन आणि 2014 साली अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली आहे. त्याचबरोबर तिने महिला दुहेरीत 2015 साली विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन स्पर्धा, तसेच 2016 साली ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

SCROLL FOR NEXT