Sania Mirza: 'मी कधीही...,' अखेरच्या सामन्यात सानियाला अश्रू अनावर; Video पाहून तुम्हीही व्हाल इमोशनल

सानिया मिर्झाला अखेरच्या ग्रँडस्लॅम सामन्यानंतर अश्रू रोखणेही कठीण झाले होते.
Sania Mirza emotional
Sania Mirza emotionalDainik Gomantak

Sania Mirza last Grand Slam: ऑस्ट्रेलियन ओपन 2023 स्पर्धेत शुक्रवारी मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना या भारतीय जोडीला पराभवाचा सामना करावा लागला.

त्यामुळे सानियाचे अखेरच्या ग्रँडस्लॅममध्ये विजेतेपदाचे स्वप्नही भंगले. या अंतिम सामन्यानंतर बोलताना सानिया भावूकही झाली होती आणि तिला तिचे अश्रूही आवरता येत नव्हते.

ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात सानिया आणि बोपन्ना या जोडीला ब्राझीलच्या ल्युसा स्टेफानी आणि राफेल मातोस या जोडीने 6-7 (2-6), 2-6 अशा फरकाने पराभूत केले. त्यामुळे सानिया आणि बोपन्नाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

दरम्यान, सानियाने ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच स्पष्ट केले होते की ऑस्ट्रेलियन ओपन 2023 स्पर्धा तिची अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा असणार आहे. त्यामुळे तिला अखेरच्या ग्रँडस्लॅम सामन्यानंतर बोलताना रडू आवरत नव्हते.

(Sania Mirza gets emotional after Australian Open 2023 mix doubles final)

Sania Mirza emotional
Sania Mirza Retirement: सानिया मिर्झाची मोठी घोषणा, 'माझ्या करिअरचा शेवट ऑस्ट्रेलियन ओपन...'

सानिया सामन्यानंतर भावूक होत म्हणाली, 'जर मी रडले, तर ते आनंदाश्रू आहेत, ते दु:खाश्रू नाहीत.'

ती पुढे अश्रू रोखण्याचा प्रयत्न करत म्हणाली, 'मी अजून काही स्पर्धा खेळणार आहे, पण माझ्या प्रोफेशनल कारकिर्दीचा प्रवास इथे मेलबर्नमध्ये 2005 साली सुरु झाला. तेव्हा मी 18 वर्षांची असताना सेरेना विलियम्सविरुद्ध तिसऱ्या फेरीत खेळले होते. 18 वर्षांपूर्वी माझ्यासाठी तो भितीदायक सामना होता.'

'पण माझे भाग्य आहे की मी इथ परत परत येऊ शकले आणि काही विजेतीपदेही जिंकू शकले आणि तुमच्या सर्वांसमोर काही चांगले अंतिम सामनेही खेळले. रोड लेवर एरिना माझ्यासाठी खूप खास आहे. यापेक्षा चांगले ठिकाण माझ्या ग्रँडस्लॅम कारकिर्दीची शेवट करण्यासाठी असू शकत नाही.'

सानियाने 2005 साली ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेपासून तिच्या ग्रँडस्लॅम कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्या स्पर्धेत तिचा तिसऱ्या फेरीत सेरेनाविरुद्ध सामना झाला होता, ज्यात तिला 6-1, 6-4 अशा फरकाने पराभव स्विकारावा लागला होता.

पण यानंतर सानियाने कधीही तिच्या कारकिर्दीत मागे वळून पाहिले नाही आणि तिने टेनिसमध्ये भारतीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करून दाखवली.

सानियाच्या अखेरच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेसाठी तिचा मुलगा इझहान आणि तिचे कुटुंबही उपस्थित होते. त्याबद्दल ती म्हणाली, 'माझे कुटुंब इथे आहे आणि मी कधीही विचार केला नव्हता की मी ग्रँडस्लॅमचा अंतिम सामना माझ्या मुलासमोर खेळू शकेल.'

Sania Mirza emotional
Australian Open: ग्रँडस्लॅमचं स्वप्न भंगलं! सानिया मिर्झा - रोहन बोपन्ना फायनलमध्ये पराभूत

सानियाने तिच्या कारकिर्दीत 6 ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. तिने 2009 साली मिश्र दुहेरीत आणि 2016 साली महिला दुहेरीत ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे विजेतेपद जिंकले होते.

तसेच तिने याशिवाय मिश्र दुहेरीत 2012 साली फ्रेंच ओपन आणि 2014 साली अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली आहे. तसेच महिला दुहेरीत 2015 साली विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली आहे. ती दुहेरीमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावरही होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com