MS Dhoni | Sunil Gavaskar Dainik Gomantak
क्रीडा

MS Dhoni - Sunil Gavaskar: 'मी माहीकडे गेलो, तेव्हा...' धोनीचा ऑटोग्राफमागील कहाणी सांगताना गावसकरांचा दाटला कंठ

Video: धोनीचा ऑटोग्राफ का घेतला, हे सांगताना गावसकर खूप भावूक झाले होते, तसेच त्यांचा कंठही दाटून आलेला

Pranali Kodre

Sunil Gavaskar revealed why he took MS Dhoni's autograph: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धा सध्या सुरु आहे. ही स्पर्धा रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत आहे. कधी एखाद्या खेळाडूची भन्नाट कामगिरी, कधी वाद, कधी काही गमतीशीर घटना अशा विविध गोष्टी चर्चेत असतात.

अशीच एक घटना गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. ही घटना म्हणजे सुनील गावसकरांनी एमएस धोनीची स्वाक्षरी घेणे. आता या घटनेबद्दल स्वत: गावसकरांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी धोनीची स्वाक्षरी का घेतली, याबद्दलही सांगितले आहे.

गावसकरांनी घेतली स्वाक्षरी

धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्सने 14 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक स्टेडियम) सामना खेळला. या सामन्यात चेन्नईला 6 विकेट्सने पराभूत व्हावे लागले होते. पण हा घरच्या मैदानावरील या हंगामातील चेन्नईचा अखेरचा साखळी सामना असल्याने धोनीसह संपूर्ण संघाने चेपॉक स्टेडियमची फेरी मारत चाहत्यांचे आभार मानले.

त्याचवेळी भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावसकर पळत धोनीकडे आले आणि त्यांनी पेन धोनीसमोर करत त्याला त्यांच्या शर्टवर स्वाक्षरी करण्यासाठी त्याच्याकडे विनंती केली. धोनीनेही ही विनंती मान्य करत त्यांच्या शर्टवर स्वाक्षरी दिली. नंतर त्यांनी गळाभेटही घेतली. या घटनेचा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला.

गावसकरांची धोनीच्या स्वाक्षरीबद्दल प्रतिक्रिया

गावसकर सध्या आयपीएलमध्ये स्टार स्पोर्ट्ससाठी समालोचन करत आहेत. त्यामुळे एका शो दरम्यान, ते धोनीने स्वाक्षरी केलेला शर्ट घेऊन आले होते. यावेळी त्यांनी धोनीची स्वाक्षरी का घेतली याबद्दल सांगितले.

गावसकर म्हणाले, 'जेव्हा मला माहित झाले की चेन्नई संघ लॅप ऑफ ऑनर (मैदानाची फेरी) घेणार आहेत, कारण हा त्यांचा घरच्या मैदानातील अखेरचा साखळी सामना होता. तेव्हाच माझ्या डोक्यात आले की मी पण माझ्या शर्टवर स्वाक्षरी घ्यावी.'

'त्यावेळी कॅमेराजवळ जे उभे होते, त्यांच्याकडे मार्कर पेनही होता. त्यामुळे त्यांनी तो मला दिला, त्यांचे मी आभारही मानतो. जेव्हा मी माहीकडे गेलो, तेव्हा मी त्याला स्वाक्षरीसाठी विनंती केली. हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण होता. या माणसाने भारतीय क्रिकेटसाठी काय काय नाही केलंय.

गावसकर पुढे असेही म्हटले आहे की माझ्या आयुष्यातील शेवटच्या क्षणी जेव्हा माझ्याकडे दोन मिनिटे असतील आणि मला दोन गोष्टी पाहायच्या असतील, तेव्हा मला कपिल देव 1983 सालचा वर्ल्डकप उचलताना आणि 2011 वर्ल्डकप अंतिम सामन्यातील धोनीचा विजयी षटकार पाहायला आवडेल. हे जर माझ्या शेवटच्या क्षणी बघायला मिळाले, तर मी आनंदाने शेवटचे क्षण घालवून हसत निघून जाईल.'

हे सर्व बोलताना गावसकर खूपच भावूक झाले होते, त्यांचा कंठही दाटून आलेला. त्यांची प्रतिक्रिया ऐकून त्यावेळी त्या शोमधील त्यांचे सहकारीही भावूक झाले. यामध्ये हरभजन सिंग देखील होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Trafficking: गोवा पोलिसांची धडक कारवाई! स्विगी डिलिव्हरी एजंटला ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक; 'इतक्या' हजारांचा गांजा जप्त

AUS vs SA: इतिहास घडला...! ऑस्ट्रेलियाच्या 22 वर्षीय पठ्ठ्यानं दक्षिण आफ्रिकेची तगडी फलंदाजी केली ध्वस्त; मोडला 38 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral Video: 'मत रो मेरे दिल...'! दारुच्या नशेत पकडल्यावर पठ्ठ्याला बायकोची आठवण, गाण्याला पोलिसानंही दिली साथ; व्हिडिओ एकदा बघाच

AUS vs SA: दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव! ऑस्ट्रेलियाने मोडला भारताचा कीर्तिमान; हेड, मार्श अन् कॅमेरुनची वादळी शतके

Congress MLA Arrested: 12 कोटी कॅश, 6 कोटींचं सोनं... मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस आमदाराला अटक, ईडीची कारवाई

SCROLL FOR NEXT