Australia vs South Africa | ICC ODI Cricket World Cup 2023 Dainik Gomantak
क्रीडा

AUS vs SA: ऑस्ट्रेलियाचा पराभव का झाला? स्मिथ-स्टॉयनिसच्या वादग्रस्त विकेट्सवरुन उलट-सुलट चर्चा

Steve Smith Wicket: ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात स्टीव्ह स्मिथ आणि स्टॉयनिसची विकेट वादग्रस्त ठरली.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, Australia vs South Africa, Steve Smith and Marcus Stoinis Wickets :

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत गुरुवारी (12 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सामना झाला. लखनऊला झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 134 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. हा ऑस्ट्रेलियाचा या स्पर्धेतील सर्वात दुसरा पराभव आहे. दरम्यान गुरुवारी झालेल्या सामन्यात काही विकेट्समुळे बराच वादही झाला.

या सामन्यात तिसऱ्या पंचांनी दिलेले काही निर्णय वादग्रस्त ठरले, ज्याचा फटकाही ऑस्ट्रेलियन संघाला बसला. या सामन्यात ज्याप्रकारे स्टीव्ही स्मिथ आणि मार्कस स्टॉयनिस यांच्या विकेट्स गेल्या, त्याची बरीच चर्चा सामन्यानंतर सोशल मीडियावर रंगली.

नक्की काय झाले होते?

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 312 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या दोन विकेट्स लवकर गमावल्या होत्या. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅब्युशेन ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळत होते.

यादरम्यानच 10 व्या षटकात कागिसो रबाडा गोलंदाजीला आला. त्याने टाकलेल्या ५ व्या चेंडूवर स्मिथची 19 धावांवर विकेट गेली. मात्र, ही विकेट वादग्रस्त ठरली. झाले असे की रबाडाने टाकेलेल्या चेंडूवर स्मिथने फटका मारला नाही, तो चेंडू स्मिथच्या पॅडला घासून गेला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने पायचीतसाठी अपील केले.

मात्र, चेंडू स्टंपला जाऊन लागत नाही, असा अंदाज घेत मैदानावरील पंचांनी नाबाद घोषित केले. मात्र, त्यावर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी डीआरएसचा वापर केला. ज्यात स्मिथला रबाडाने टाकलेला चेंडू ऑफ स्टंपला लागत असल्याचे दिसले आणि स्मिथला बाद देण्यात आले. मात्र, यावर सर्वचजण चकीत झाले.

कारण ज्यावेळी स्मिथच्या पॅडला चेंडू लागला, त्यावरून तरी चेंडू स्टंपला लागणार नाही, असे दिसत होते. मात्र, रिप्लेमध्ये हॉकआयने चेंडू स्टंपला लागल्याचे दाखवले. त्यामुळ अनेकांनी रिप्लेमध्ये काहीतरी गोंधळ झाल्याचे अंदाज बांधले, अनेकांनी ही विकेट चुकीच्या पद्धतीने दिली असल्याचेही म्हटले. स्मिथही या विकेटनंतर निराश होऊन माघारी परतल्याचे दिसले.

स्मिथ बाद झाल्यानंतर मार्कस स्टॉयनिसच्या विकेटबाबतही असाच वाद झाला. 18 व्या षटकातही रबाडाच गोलंदाजी करत होता. त्याने टाकलेल्या दुसऱ्या चेंडूवर स्टॉयनिसने फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्याकडून तो चूकला आणि चेंडू मागे गेला. त्यावेळी यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकने तो झेलला.

त्यावर दक्षिण आफ्रिकेने झेलबादसाठी अपील केले. पण मैदानावरील पंचांनी हा निर्णय तिसऱ्या पंचाकडे सोपवला. तिसऱ्या पंचांनी तपासलेल्या रिप्लेमध्ये स्टॉयनिसच्या हाताच्या जवळून चेंडू जात असताना अल्ट्राएजमध्ये स्पार्क दिसला. त्यावरून चेंडू स्टॉयनिसच्या ग्लव्ह्जला लागल्याचे दिसले.

परंतु ज्यावेळी चेंडूचा स्पर्श होत होता, त्याचवेळी स्टॉयनिस तो हात बॅटच्या हँडलवरून बाजूला घेताना दिसला होता. क्रिकेटच्या नियमानुसार जेव्हा फलंदाजाचा हात बॅटवरून निघाल्यानंतर जर चेंडू हाताला लागला, तर नाबाद दिले जाते.

मात्र, इथे त्याचा हात बाजूला होत असतानाच चेंडू लागल्याचे स्पार्क अल्ट्राएजमध्ये दिसला. त्यामुळे त्याला देण्यात आलेला बादचा निर्णयही वादग्रस्त ठरला. स्टॉयनिस 5 धावांवर बाद झाला.

ऑस्ट्रेलियाचा झाला पराभव

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ 312 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 40.5 षटकात 177 धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून लॅब्युशेनने सर्वाधिक 46 धावा केल्या.

तसेच दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच मार्को यान्सिन, केशव महाराज आणि ताब्राईज शम्सी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स, तर लुंगी एन्गिडीने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"पत्नीसोबत Dinner की Sunrise बघायला आवडेल?" CM सावंतांच्या दिलखुलास गप्पा; Watch Video

Bits Pilani: 'बिट्स पिलानी मृत्यूप्रकरणी SIT नेमा'! NSUI ची मागणी; कायदा सुव्यवस्था कोलमडल्याचा आरोप

Bisons In Goa: लाखेरेत गव्यांसह रानडुकरांचा धुमाकूळ! लोकांमध्ये भीतीचे वातावरण; बागायतीची मोठी नासधूस

Goa Coastal Plan: गोवा सागरी आराखड्यास होतोय विलंब! सल्लागाराची अद्याप नेमणूक नाही; डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार काम

Goa Politics: फोंड्यात राजकीय घडामोडींना वेग! 'भाजप'मध्ये वाढला अंतर्गत संघर्ष; रवींच्या वाढदिनाकडे सर्वांच्या नजरा

SCROLL FOR NEXT