IND vs PAK: अहमदाबादमध्ये महामुकाबला, पण पाकिस्तानसमोर असतील 'ही' 4 आव्हाने

World Cup 2023: वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध सामन्यात खेळताना पाकिस्तानसमोर कोणकोणती आव्हाने असणार आहेत, याचा घेतलेला आढावा.
India vs Pakistan
India vs PakistanDainik Gomantak
Published on
Updated on

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Pakistan:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना शनिवारी (14 ऑक्टोबर) रंगणार आहे. हा सामना जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर म्हणजेच अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे.

दरम्यान, हा सामन्यासाठी भारतीय संघ वर्ल्डकपमधील सलग दोन विजयांसह मैदानात उतरणार आहे, तर पाकिस्तानने वर्ल्डकप 2023 स्पर्धेत एक विजय आणि एक पराभव स्विकारला आहे. तसेच वनडे वर्ल्डकपमध्ये आत्तापर्तंय भारत पाकिस्तानविरुद्ध अपराजित आहे.

त्यामुळे यंदातरी हा इतिहास बदलण्यासाठी पाकिस्तान उत्सुक असणार आहे. पण त्यासाठी त्यांना बलाढ्य आणि मायदेशात खेळणाऱ्या भारतीय संघाच्या मजबूतींविरुद्ध वरचढ व्हावे लागणार आहे. तथापि, पाकिस्तानसमोर भारतीय संघाविरुद्ध जिंकण्यासाठी कोणती आव्हाने असतील, यावर नजर टाकू.

तगडी फलंदाजी फळी

भारताची ताकद ही त्यांची फलंदाजी फळी आहे. तसेच भारताचे सध्या तरी सर्वच फलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. गेल्या दोन महिन्यात रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर यांनी शतके केली आहेत, तर सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा यांचीही कामगिरी चांगली राहिली आहे.

महत्त्वाचे म्हणजे भारतीय संघात फलंदाजीची सखोलता आहे. जवळपास 8 व्या क्रमांकापर्यंत खेळाडू फलंदाजी करू शकतात. त्याचमुळे प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांना ज्यादाचे कष्ट घ्यावे लागत आहेत.

पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने हे दाखवून दिले आहे. ऑस्ट्रेलियाने 2 धावात 3 विकेट्स घेतल्यानंतरही भारताने 6 विकेट्सने सामना जिंकला होता. त्यामुळे पाकिस्तानसमोर सर्वात मोठे आणि पहिले आव्हान भारतीय फलंजादाजांना मोठ्या धावा करण्यापासून वाचवण्याचे असणार आहे.

India vs Pakistan
'IND vs PAK सामन्यासाठी आता...' अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर सचिन तेंडुलकरची पोस्ट व्हायरल

क्षेत्ररक्षणात करावी लागेल सुधारणा

भारतीय फलंदाजांची फलंदाजी फळी मजबूत असल्याने पाकिस्तानला क्षेत्ररणात सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे. क्षेत्ररणातील ढीसाळपणामुळे जर ज्यादाच्या धावा गेल्या, तर त्या त्यांना महागात पडू शकतात. त्यामुळे क्षेत्ररक्षणात कमी चूका करण्याकडे पाकिस्तानला लक्ष द्यावे लागणार आहे.

फिरकी गोलंदाजांचा करावा लागेल सामना

पाकिस्तानच्या संघाकडेही चांगेल फलंदाज असले, तरी फिरकी गोलंदाजी ही त्यांची कमजोरी आहे. 2019 नंतर पाकिस्तान संघाने फिरकी गोलंदाजीविरुद्ध साधारण 5च्या इकोनॉमीनेच धावा केल्या आहेत, त्यातुलनेत वेगवान गोलंदाजी मात्र पाकिस्तानचा संघ चांगला खेळतो.

मात्र त्यांची ही कमजोरी भारताविरुद्ध महागात पडू शकते. कारण भारताकडे फिरकी गोलंदाजीसाठी रविंद्र जडेजा, कुलदीप यादव आणि आर अश्विन असे पर्याय आहेत. तसेच भारतातील खेळपट्ट्या या फिरकी गोलंदाजीला मदतगार आहेत.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की वर्ल्डकपमध्ये आमने-सामने येण्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान संघ अखेरच्यावेळी आशिया चषकातील सुपर फोर फेरीत आमने सामने आले होते.

त्या सामन्यात भारताने दिलेल्या 357 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ अवघ्या 128 धावांवर सर्वबाद झाला होता. त्या सामन्यात चायनामन कुलदीपने 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे पाकिस्तानसमोर भारताच्या फिरकी आक्रमणाचा सामना करणे, हे एक आव्हान असणार आहे.

India vs Pakistan
'नशीब कसोटी खेळतो, पण मी पस्तीशी पार करेल, त्यामुळे...', विराट IND vs PAK मॅचनंतर असं का म्हणाला, वाचा

भारताचा नरेंद्र मोदी स्टेडियमवर विजयी रथ रोखण्याचे आव्हान

भारताने 2022 पासून पुन्हा नव्याने बांधण्यात आलेल्या मोटेरा स्टेडियमवर (आताचे नाव नरेंद्र मोदी स्टेडियम) 3 सामने खेळले आहेत. या तिन्ही सामन्यात भारताने मोठे विजय मिळवले आहेत. त्यामुळे या मैदानात भारताचा विजयी रथ रोखण्याचे आव्हान पाकिस्तानसमोर असेल.

दरम्यान, अहमादाबादमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताने एकच वनडे सामना खेळला आहे. 12 एप्रिल 2005 रोजी झालेल्या या सामन्यात भारताला 3 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला होता. पण त्यानंतर या स्टेडियमचे पूर्ण नुतनीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे नुतनीकरण केलेल्या स्टेडियमवर मध्ये भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदाच आमने-सामने येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com