Sri Lanka Cricket Team | Time out celebration X/OfficialSLC
क्रीडा

BAN vs SL: श्रीलंकेनं T20I मालिका विजयानंतर 'टाईम आऊट' सेलिब्रेशन करत बांगलादेशला डिवचलं, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Sri Lanka Time-Out Celebration: श्रीलंकेने बांगलादेशविरुद्ध टी20 मालिका जिंकल्यानंतर 'टाईम आऊट' सेलिब्रेशन केले, ज्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

Pranali Kodre

Sri Lanka Time-Out Celebration

श्रीलंका संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील टी20 मालिका नुकतीच शनिवारी (9 मार्च) संपली. शनिवारी झालेल्या तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेने 28 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-1 अशा फरकाने विजय मिळवला. दरम्यान, या विजयानंतर श्रीलंका संघाने केलेल्या सेलिब्रेशनची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली.

मालिका नावावर केल्यानंतर श्रीलंकेच्या संघाने बांगलादेशला डिवचण्यासाठी एक अनोखे सेलिब्रेशन केले. त्यांनी मालिका विजयाची ट्रॉफी स्विकारल्यानंतर फोटो सेशनवेळी हाताच्या मनगटावर बोट ठेवले आणि काल्पनिक घड्याळ असल्याचे दाखवले. यातून त्यांनी टाईम-आऊटची आठवण बांगलादेशला करून दिली.

टाईम आऊट सेलिब्रेशनचा काय आहे संदर्भ

खरंतर या सेलिब्रेशनचा संदर्भ वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यातील एक टाईम आऊटच्या घटनेशी आहे. दिल्लीत झालेल्या या सामन्यात श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजला टाईम आऊटच्या नियमाखाली बाद देण्यात आले होते. यावरून खूप वाद झाला होता.

बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनने 25 व्या षटकात सदीरा समरविक्रमाला बाद केल्यानंतर सहाव्या क्रमांकावर मॅथ्यूज फलंदाजीला उतरला होता. तो मैदानावरही आला, परंतु बॅटिंग स्टान्स घेण्यावेळीच त्याला हेल्मेटची काहीतरी समस्या झाल्याचे जाणवले आणि तो परत बाउंड्री लाईनच्या दिशेने जाऊ लागला.

त्यावेळी शाकिबने त्याच्याविरुद्ध टाईम आऊट नियमानुसार बादसाठी पंचांकडे अपील केले. याबाबत मॅथ्यूजने शाकिबकडे त्याचा निर्णय मागे घेण्यासाठी विनंतीही केली होती, परंतु तो त्याच्या अपीलवर ठाम राहिला. त्यामुळे पंचांनाही नियमानुसार त्याला बाद द्यावे लागले. या घटनेबद्दल क्रिकेट वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या.

श्रीलंकेने केली परतफेड

दरम्यान, आता श्रीलंकेने बांगलादेशविरुद्ध त्यांच्याच मायदेशात टी20 मालिका जिंकल्यानंतर टाईम-आऊटचे सेलिब्रेशन करत त्या घटनेची परतफेड केली आहे.

तथापि, श्रीलंकेच्या या सेलिब्रेशनवर बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोने नाराजी व्यक्त करताना म्हटले की श्रीलंकेने आता त्यातून पुढे जायला पाहिजे, त्यांनी वर्तमानात जगायला हवे.'

श्रीलंका आणि बांगलागदेश यांच्यातील मालिकेबद्दल सांगायचे झाले, तर पहिल्या टी20 सामन्यात श्रीलंकेने अवघ्या 3 धावांनी विजय मिळवला होता, तर दुसरा टी२० सामना बांगलादेशने 8 विकेट्सने जिंकला. तसेच तिसरा आणि निर्णायक सामना श्रीलंकेने जिंकत मालिका जिंकली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT