Timed Out: टाईम आऊटच्या वादग्रस्त घटनेवर मॅथ्यूज अन् शाकिबनेही दिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Angelo Mathews: श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामन्यात झाेलेल्या टाईम आऊटच्या वादग्रस्त घटनेवर अँजेलो मॅथ्यूज आणि शाकिब अल हसन यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Angelo Mathews - Shakib Al Hasan
Angelo Mathews - Shakib Al Hasan

Angelo Mathews and Shakib al Hasan opened up about Time out:

वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये सोमवारी (6 नोव्हेंबर) श्रीलंका विरुद्ध बांगलादेश संघात सामना खेळला गेला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बांगलादेशने 3 विकेट्सने विजय मिळवला. मात्र, या सामन्यात अँजेलो मॅथ्यूजला टाईम आऊट दिल्याने बराच वाद झाला.

या सामन्यात श्रीलंका प्रथम फलंदाजीला उतल्यानंतर 25 व्या षटकात ही वादग्रस्त घटना घडली. या षटकात दुसऱ्या चेंडूवर सदीरा समरविक्रमाला बांगलागदेशचा कर्णधार शाकिब अल हसनने 41 धावांवर बाद केले.

त्यावेळी सहाव्या क्रमांकावर अँजेलो मॅथ्यूज फलंदाजीला उतरणार होता, तो मैदानात आलाही पण पहिला चेंडू खेळण्यापूर्वीच हेल्मेटची काहीतरी समस्या झाल्याने परत गेला. त्यावेळी बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन आणि संघाने त्याच्याविरुद्ध टाईम आऊट नियमानुसार बादसाठी पंचांकडे अपील केले.

पंचांनाही नियमानुसार त्याला बाद द्यावे लागले. त्याने नंतर शाकिब आणि पंचांकडे हा निर्णय मागे घेण्यासाठी विनवणी केली, मात्र बांगलादेशने त्यांचा निर्णय मागे घेतला नाही.

Angelo Mathews - Shakib Al Hasan
World Cup 2023: वर्ल्ड कप 2023 मधून श्रीलंका आऊट, बांगलादेशने 3 गडी राखून जिंकला सामना!

या घटनेवर सामन्यानंतर शाकिब आणि मॅथ्यूज यांनी आपापले मत व्यक्त केले आहे. दोघांनीही आपापल्या बाजू मांडल्या आहेत. शाकिबने नियमानुसार अपील केल्याचे म्हटले, तर मॅथ्यूजने हे निराशाजनक असल्याचे म्हटले.

शाकिब म्हणाला, 'एक क्षेत्ररक्षक माझ्याकडे आला आणि म्हणाला, जर तू अपील केलं, तर नियमानुसार तो बाद आहे, कारण त्याने अजून चेंडू खेळण्यासाठी गार्ड घेतलेला नाही. त्यामुळे मी अपील केले. पंचांनी मला विचारले की तू अपील मागे घेणार आहेस की नाही, मी त्यांना नाही म्हणून सांगितले.'

तसेच शाकिबने सांगितले की मॅथ्यूज देखील त्याच्याकडे आला होता. शाकिब म्हणाला, 'मी त्याला खूप चांगले ओळखतो आणि मीही त्याला खूप चांगले ओळखतो. त्यामुळे तो माझ्याकडे आला आणि त्याने विचारले की मी माझे अपील मागे घेणार आहे का? मी त्याला म्हणालो, तूला माहित आहे, मी तुझी परिस्थिती समजतो, पण हे दुर्दैवी आहे, मात्र मी अपील मागे घेणार नाही.'

'हा नियम आहे की फलंदाजाने नियोजित वेळेत क्रिजवर यायला हवे, पण ते वेळेत तिथे नव्हता.'

Angelo Mathews - Shakib Al Hasan
World Cup 2023: भारतात मोडला वर्ल्ड कपमधील षटकारांचा 'हा' महारेकॉर्ड, 48 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच...

मॅथ्यूजने म्हटले लाजीरवाणे

याच प्रकरणाबद्दल मॅथ्यूजने सामन्यानंतर म्हटले, 'मला क्रिजपर्यंत येण्यासाठी 2 मिनिटे वेळ होता, मला वाटते मी त्यावेळत आलो होते. त्यानंतर हेल्मेटची समस्या झाली. मला माहित नाही की इतकी साधी गोष्ट कळू नये, कारण बांगलादेश आणि शाकिबकडून जे झाले, ते खूप लाजीरवाणे होते.'

'जर त्यांना याप्रकारे क्रिकेट खेळायचे असेल, तर काहीतरी नक्कीच चुकीचे आहे. माझे हेल्मेट तुटल्यानंतर देखील माझ्याकडे 5 सेकंद आणखी होते.'

त्याचबरोबर सामन्यानंतर श्रीलंकन संघाने बांगलादेशला हात मिळवण्यासाठी नकार दिल्याबद्दल मॅथ्यूज म्हणाला, 'जे लोक आम्हाला आदर देतात, त्यांनाच आदर द्यायला हवा.'

या सामन्यात श्रीलंकेने 49.3 षटकात सर्वबाद 279 धावा केल्या, त्यानंतर 280 धावांचे आव्हान बांगलादेशने 7 विकेट्स गमावत 42 षटकात पूर्ण केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com