पणजी ः अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (All India Football Federation) गोकुळम केरळा (Gokulam Kerala) संघास आशियाई फुटबॉल महासंघाच्या (AFC) महिला क्लब स्पर्धेसाठी निवडले आहे, त्यामुळे या संघाची कर्णधार गोमंतकीय फुटबॉलपटू मिशेल कास्ताना (Michel Castanha) हिलाही संधी प्राप्त झाली आहे. मिशेल हिच्या नेतृत्वाखाली गोकुळम केरळा संघाने फेब्रुवारी 2020 मध्ये क्रिफ्सा एफसी संघाला नमवून भारतीय महिला लीग फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. 2021 मध्ये कोरोना विषाणू महामारीमुळे या स्पर्धेचा पाचवा मोसम होऊ पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एएफसी महिला क्लब स्पर्धेसाठी भारतातर्फे महासंघाने गोकुळम केरळा संघाला मागील विजेतेपदानुसार निवडले आहे. महिलांच्या या स्पर्धेत भारतीय क्लब प्रथमच खेळत असून त्यामुळे मिशेल हिलाही आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी लाभली आहे.
चौथ्या महिला लीग स्पर्धेनंतर मिशेलला कोविड-19 मुळे इनडोअर सराव करावा लागला. मध्यंतरी तिच्या गुडघ्याला दुखापत झाली, त्यामुळे उझबेकिस्तान व बेलारूसविरुद्धच्या मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय फुटबॉल लढतीत ती खेळू शकली नाही. आता ती पूर्ण तंदुरुस्त असून येत्या ऑक्टोबरच्या अखेरीस होणाऱ्या एएफसी महिला क्लब फुटबॉल स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गोकुळम केरळा संघाचा ब (पश्चिम विभाग) गटात समावेश आहे. या गटात जॉर्डन, इराण, उझबेकिस्तान या देशातील संघही असतील. बचावफळीत खेळणारी मिशेल ही भारताची आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू आहे. गोवा फुटबॉल असोसिएशनच्या महिला लीग स्पर्धेत ती चमकली. नंतर भारतीय महिला लीगसाठी तिला गोकुळम केरळा संघाने निवडले आणि तिने या संघाचे नेतृत्वही केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.