Spinner Rashid Khan Dainik Gomantak
क्रीडा

T-20 World Cup 2021 फिरकीपटूच गाजवतील; रशीद खानला विश्वास

Dainik Gomantak

T-20 World Cup: अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खानला (Spinner Rashid Khan) विश्वास आहे की, T20 विश्वचषकातही फिरकी गोलंदाजच वर्चस्व गाजवतील. अफगाणिस्तानसाठी दुसरा T20 विश्वचषक खेळणाऱ्या रशीदने सांगितले की संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील तिन्ही ठिकाणची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी साथ करणारी असेल. IPL मध्ये रशीद सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाकडून खेळतो, मात्र IPL 2021च्या गुणतालिकेत सनरायझर्स तळाशी होता, पण रशीदची मात्र गोलंदाजीमध्ये आपली छाप सोडली. रशीद खान, युझवेंद्र चहल आणि वरुण चक्रवर्तीसह संयुक्तरित्या सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता त्याने १८ विकेट घेतल्या. IPL 2020 मध्येही चहल आणि रशीद दोघेही सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत पहिल्या 10 मध्ये होते.

रशीद म्हणाला, UAE मध्ये फिरकीपटूंसाठी परिस्थिती नेहमीच फायदेशीर असते आणि मला वाटते की हा फिरकीपटूंचा विश्वचषक असेल. विकेट्स कशा बनतात हे महत्त्वाचे नाही, कारण ते नेहमी फिरकी गोलंदाजांना अनुकूल असतात. या विश्वचषकात फिरकीपटूंची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. आम्ही IPL मध्ये पाहिल्याप्रमाणे प्रत्येक वेळी फिरकीपटूच संघाला सामन्यात परत आणताना पहिले होते. मला आताही असेच वाटते की, या विश्वचषकातही चित्र तसेच राहील, फक्त ज्या संघात सर्वोत्तम फिरकीपटू आहेत तेच आपल्या संघाला सामन्यात परत आणतील किंवा सामना जिंकतीलही.

यूएईमध्ये आयपीएलचे दोन्ही हंगाम पाहिले तर हे स्पष्ट होते की येथे फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व आहे. दुबईतील एकूण विकेट्समध्ये स्पिनर्सचा वाटा 30.80 टक्के, शारजाहमध्ये 31.10 आणि अबू धाबीमध्ये एकूण विकेट्सचा 32.1 टक्के आहे. भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंडचाही सहभाग आहे, त्यांच्यासाठी चांगले काम करणे आव्हान असेल कारण या सर्व संघांकडे फलंदाज आहेत जे चांगले फिरकी खेळतात, त्यामुळे त्यांना अधिक मेहनत करावी लागेल. 2016 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानने सुपर 10 मध्ये स्थान मिळवले होते, पण तेथे त्यांना फक्त एक विजय मिळवता आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cutbona Jetty: 'मतदारसंघात आम्हालाच बोलावले जात नाही!' कुटबणबाबत क्रुझ सिल्वांचा हल्लाबोल

Goa BJP: 'पक्ष व सरकार यांच्यात समन्वय पाहिजेच'; गोवा भाजपच्या बैठकीत मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची तंबी

रस्त्यांचा सुमार दर्जाच कारणीभूत! अधिकाऱ्यांबरोबर कंत्राटदारही जबाबदार; आमदार लोबो

खरी कुजबुज: रवींचे ‘एका दगडात दोन पक्षी’

Goa Crime: व्‍हिडिओ व्‍हायरल करण्‍याची धमकी देणाऱ्या तरुणास अटक; असाहाय्य माय-लेकींवर अत्‍याचार

SCROLL FOR NEXT