T-20 World Cup: पाकिस्तानची फलंदाजी पाहून भारताने तयार केला 'मास्टर प्लॅन'

दुबई क्रिकेट स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघाचे (Indian Team) आगमन झाले, परंतु त्यांच्या सामन्याआधी खेळाडू आणि कर्मचारी पाकिस्तान (Pakistan) आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना पाहताना दिसले.
भारतीय खेळाडू (Indian Players) आणि कोचिंग स्टाफ पाकिस्तानी संघाच्या खेळाडूंना फलंदाजी करताना उत्सुकतेने पाहताना.
भारतीय खेळाडू (Indian Players) आणि कोचिंग स्टाफ पाकिस्तानी संघाच्या खेळाडूंना फलंदाजी करताना उत्सुकतेने पाहताना.Twitter/@Cric_crazy_girl
Published on
Updated on

भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात टी -20 वर्ल्डकपमधील सामना (T-20 World Cup 2021) 24 ऑक्टोबरला खेळण्यात येणार आहे. पण त्याआधी भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू एकमेकांसमोर आले. पाकिस्तान आणि भारताचा संघाचे सध्या सराव सामने सुरु आहेत. दोन्ही संघांचा सामना सोमवारी एकाच मैदानावर होणार होता. सोमवारी भारतीय संघ (Indian Team) इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यासाठी आयसीसी क्रिकेट अकॅडमीमध्ये पोहोचला तेव्हा भारतीय खेळाडू आणि कोचिंग स्टाफ पाकिस्तानी संघाच्या खेळाडूंना फलंदाजी करताना उत्सुकतेने पाहत होते.

भारतीय खेळाडू (Indian Players) आणि कोचिंग स्टाफ पाकिस्तानी संघाच्या खेळाडूंना फलंदाजी करताना उत्सुकतेने पाहताना.
T-20 World Cup: इंग्लंडविरुध्दच्या सराव सामन्यात फलंदाज पास,गोलंदाज नापास

दुबई क्रिकेट स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचे आगमन झाले, परंतु त्यांच्या सामन्याआधी खेळाडू आणि कर्मचारी पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना पाहताना दिसले. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल खूप होत आहेत. काही चित्रांमध्ये प्रशिक्षक रवी शास्त्री भुवनेश्वर कुमार, दीपक चहर आणि शार्दुल ठाकूर पाकिस्तानचा सामना आतुरतेने पाहत आहेत.

भारतीय खेळाडू (Indian Players) आणि कोचिंग स्टाफ पाकिस्तानी संघाच्या खेळाडूंना फलंदाजी करताना उत्सुकतेने पाहताना.
T-20 World Cup: टीम इंडिया करतेय 'गब्बर'ला मिस, विराटचा व्हिडिओ होतोय व्हायरल...

भारतीय संघ मैदानात आला, तेव्हा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम क्रीजवर होता. बाबर एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रथम क्रमांकाचा फलंदाज आहे. 24 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाला मोठा धोका त्याचाच मानला जात आहे. अशा स्थितीत भारतीय कर्मचारी त्याची फलंदाजी पाहून काही विशेष योजना तयार करू शकतात.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही संघांमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही. कारण 5-10 मिनिटांनी भारतीय संघ इंग्लंडविरुध्दच्या सामन्यासाठी सराव करण्यासाठी मैदानात उतरला. बाबरने 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने अर्धशतकी खेळी खेळली. पाकिस्तानने सराव सामन्यात वेस्ट इंडिजचा सात गडी राखून पराभव केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com