T20 World Cup 2021: पाकिस्तानविरुध्द टीम इंडियाच्या या गोलदांजाना 'मौका'...

पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा (Team India’s Playing XI) संघ कसा असेल याची क्रिकेटप्रेमींना चांगलीच उत्सुकता लागली आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा (Team India’s Playing XI) संघ कसा असेल याची क्रिकेटप्रेमींना चांगलीच उत्सुकता लागली आहे. टीम इंडियाचे बॉलिंग कॉम्बिनेशन कसे असेल? त्याचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मागील काही दिवसांपासून केलेल्या वक्तव्यांचा धांडोळा घेतल्यानंतर त्यासंबंधीचा अंदाज लावणं जास्त काही कठीण नाही. संघाचे बॉलिंग कॉम्बिनेशन कसे असू शकते याचा अंदाज लावण्यापूर्वी, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अर्थात रवी शास्त्री (Ravi Shastri) काय म्हणाले हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. रवी शास्त्री यांनी म्हटले आहे की, भारतीय संघ अतिरिक्त फिरकीपटू किंवा अतिरिक्त वेगवान गोलंदाजासह जाईल, मैदानावर पडणारे दवं लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात येईल असही त्यांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, “आम्ही मैदानावर पडणारं दव लक्षात घेता बॉलिंग कॉम्बिनेशनसह कसे जायचे ते ठरवू. वॉर्म-अप मॅचमुळे टीमला चांगले कॉम्बिनेशन तयार करण्यास मदत होईल. रवी शास्त्री यांनी माध्यमाशी पुढे बोलताना म्हटले की, “ मैदानावरील नेमकी स्थिती काय असू शकते यानुसार संघाची रणनिती ठरविण्यात येईल. त्यानुसार आम्ही फलंदाजी आणि गोलंदाजीबाबत निर्णय घेऊ. दव बघून, आम्ही संघाच्या बॉलिंग कॉम्बिनेशनसंबंधी निर्णय घेऊ."

Team India
T20 World Cup: आता मल्टिप्लेक्समध्ये पाहता येणार सामने, ICC चा PVR सोबत करार

भारताचे बहुतेक सामने संध्याकाळी

टी -20 विश्वचषकात (T20 World Cup 2021) भारताला आपले सर्व सामने संध्याकाळी खेळायचे आहेत. हे लक्षात घेऊन टीम इंडियाला आपली रणनीती बनवावी लागेल. जर मैदानावर जास्त दवं पडले तर फिरकीपटूंसाठी ते कठीण होईल. त्यांना चेंडूची ग्रीप पकडणे अधिक कठीण होईल, ज्यामुळे फलंदाजांसाठी काम सोपे होईल. हे स्पष्ट आहे की, जर दव जास्त असेल तर भारत 3 वेगवान गोलंदाज आणि 2 फिरकीपटूसह भारतीय संघ उतरेल. आणि, जर दवं अडथळा बनलं नाही तर 3 फिरकी गोलंदाज आणि 2 वेगवान गोलंदाजासंह टीम इंडिया उतरेल.

Team India
T20 World Cup 2021: क्रिकेटसाठी 'या' खेळाडूने सोडला होता देश

बॉलिंग कॉम्बिनेशनवर लक्ष्मण आणि इरफानचे आकलन

क्रिकेट दिग्गजांनीही टीम इंडियाच्या बॉलिंग कॉम्बिनेशनवर आपली मते नोंदवली आहेत. व्हीव्हीएस लक्ष्मणच्या मते, भारताने 3 फिरकीपटू आणि 2 वेगवान गोलंदाजांसह जायला हवे. त्याचबरोबर इरफान पठाणने 3 वेगवान गोलंदाजांसह 2 फिरकी गोलंदाजांना संधी देण्यात यावी. तसेच त्याने नावेही सांगितली आहेत. इरफानच्या मते, भारतीय संघाने भुवी, शमी आणि बुमराह यांच्यासोबत वेगवान गोलंदाजीसह उतरावे. तर फिरकी जाडेजा आणि वरुण चक्रवर्तीसोबत जायला हवी. तसे, जर तिसरा फिरकीपटू खेळायचा असेल, तर भारताला अश्विन आणि राहुल चहर यांच्यापैकी एकाची निवड करावी लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com