South Africa Cricket ICC
क्रीडा

World Cup 2023: दक्षिण आफ्रिकेची मुंबईत 'विजयादशमी'! बांगलादेशला केलं चारीमुंड्या चीत

South Africa vs Bangladesh: दक्षिण आफ्रिकेने मंगळवारी बांगलादेशचा दारुण पराभव करत चौथा विजय नोंदवला.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, South Africa vs Bangladesh match Result:

मंगळवारी (24 ऑक्टोबर) भारतभरात दसरा आणि विजयादशमी दणक्यात साजरी होत असतानाच वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेने मोठा विजय मिळवला. मंगळवारी दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला 149 धावांनी पराभूत केले.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशसमोर 383 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 46.4 षटकात 233 धावा करून सर्वबाद झाला. बांगलादेशकडून महमुद्दुलाहने शतक केले, पण त्याला बाकी कोणाकडून भक्कम साथ मिळाली नाही.

दक्षिण आफ्रिकेचा हा या स्पर्धेतील 5 सामन्यांमधील चौथा विजय आहे. तसेच बांगलादेशने मात्र 5 सामन्यांमधील चौथा पराभव स्विकारला आहे.

या सामन्यात 383 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशकडून तान्झिद हसन आणि लिटन दास यांनी चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र तान्झिद 12 धावांवर सातव्या षटकात मार्को यान्सिनविरुद्ध खेळताना बाद झाला. त्याच्या पुढच्याच चेंडूवर यान्सिनने नजमुल होसैन शान्तोला शुन्यावर माघारी धाडले.

त्यानंतर कर्णधार शाकिब अल हसन (1) आणि मुश्फिकुर रहिमही (8) स्वस्तात बाद झाले. चांगली सुरुवात मिळालेला लिटन दासही 22 धावांवर बाद झाला.

दरम्यान, सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या मेहमुद्दुलाहने शतकी खेळी करत एक बाजू सांभाळली. पण त्याला अन्य फलंदाजांकडून फारशी साथ मिळाली नाही. मेहदी हसन मिराज ११ धावांवर, नसूम अहमद 19 धावांवर आणि हसन मेहमूद 15 धावांवर बाद झाला.

अखेर महमुद्दुलाहची विकेट घेण्यात गेराल्ड कोएत्झीला यश मिळाले. त्याने 46 व्या षटकात मार्को यान्सिनच्या हातून त्याला झेलबाद केले. महमुद्दुलाहने 111 चेंडूत 11 चौकार आणि 4 षटकारांसह 111 धावा केल्या. त्यानंतर मुस्तफिझुर रेहमान 11 धावांवर बाद झाला आणि बांगलादेशचा डावही संपुष्टात आला.

दक्षिण आफ्रिकेकडून गेराल्ड कोएत्झीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तसेच मार्को यान्सिन, लिझाड विल्यम्स आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्याबरोबर केशव महाराजने 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र सलामीवीर रिझा हेड्रिक्स (12) आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला रस्सी वॅन डर द्युसेन (1) लवकर बाद झाले.

मात्र सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि मधल्या फळीतील फलंदाज आणि कर्णधार एडेन मार्करम यांनी दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरताना तिसऱ्या विकेटसाठी 131 धावांची भागीदारी केली. पण त्यांची भागीदारी रंगत असतानाच मार्करम 69 चेंडूत 60 धावा करून बाद झाला.

तरी डी कॉकने आपली लय कायम ठेवली आणि 101 चेंडूत या स्पर्धेतील तिसरे शतक केले. शतकानंतर त्याने आपली धावगती वाढवली, त्याला हेन्रिक क्लासेनचीही भक्कम साथ मिळाली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 87 चेंडूतच 142 धावांची भागीदारी केली.

यादरम्यान डी कॉक द्विशतकही करेल असे अनेकांना वाटत असतानाच 46 व्या षटकात त्याला हसन मेहमुदने नसूम अहमदच्या हातून झेलबाद केले. डी कॉकने 140 चेंडूत 174 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 15 चौकार आणि 7 षटकार मारले. तो बाद झाल्यानंतर क्लासेनने डेव्हिड मिलरला साथीला घेतले आणि आक्रमक खेळत 65 धावांची भागीदारी केली.

मात्र, 90 धावांवर असताना क्लासेनला 50 व्या षटकात हसन मेहमुदनेच बाद केले. क्लासेनने 49 चेंडूत 2 चौकार आणि 8 षटकारांसह ही 90 धावांची खेळी केली. अखेर मिलर 15 चेंडूत 34 धावा करून नाबाद राहिला, तर मार्को यान्सिन 1 धावेवर नाबाद राहिला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने 50 षटकात 5 बाद 382 धावा केल्या.

बांगलादेशकडून हसन मेहमुदने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या, तर मेहदी हसन मिराज, शोरीफुल इस्लाम आणि शाकिब अल हसन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

SCROLL FOR NEXT