World Cup 2023: डी कॉक ऑन फायर! स्पर्धेतील ठोकलं तिसरं शतक, आता निशाण्यावर रोहितचा वर्ल्ड रेकॉर्ड

Quinton de Kock: क्विंटन डी कॉकने वर्ल्डकप 2023 स्पर्धेत तिसरे शतक ठोकत मोठे विक्रम नावावर केले आहेत.
Quinton de Kock Century
Quinton de Kock Century
Published on
Updated on

ICC ODI Cricket World Cup 2023m South Africa vs Bangladesh match, Quinton de Kock century :

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत मंगळवारी दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश संघात सामना सुरू आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉकने शतकी खेळी केली आहे. याबरोबरच त्याने काही विक्रम केले आहेत.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्याकडून क्विंटन डी कॉकबरोबर रिझा हेंड्रिक्स सलामीला फलंदाजीला उतरला, मात्र तो 12 धावांवरच बाद झाला, तर रस्सी वॅन डर ड्युसेनही 1 धावेवर बाद झाला.

मात्र, त्यानंतर डी कॉक आणि कर्णधार एडेन मार्करम यांनी शतकी भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेचा डाव सारवला. दरम्यान मार्करमही 60 धावांवर बाद झाला. पण असे असले तरी डी कॉकने आपली लय कायम ठेवली आणि 101 चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले. तो नंतर 140 चेंडूत 174 धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने 15 चौकार आणि 7 षचकार मारले.

डी कॉकचे हे वनडे कारकिर्दीतील 20 वे शतक आहे. त्यामुळे तो वनडेत 20 किंवा त्यापेक्षा अधिक शतके करणारा दक्षिण आफ्रिकेचा चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्यापूर्वी हाशिम आमला (27 शतके), एबी डिविलियर्स (25 शतके) आणि हर्षेल गिब्स (21 शतके) यांनी 20 हून अधिक शतके केली आहेत.

Quinton de Kock Century
World Cup 2023: गतविजेते इंग्लंड गाळात, अफगाणिस्तानच्या पाकिस्तानवरील वियानंतर पाँइंट्स टेबलमध्ये उलथापालथ

दिग्गजांची बरोबरी

दरम्यान, डी कॉकचे हे वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील तिसरे शतक आहे. त्याने याआधी श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका या संघांविरुद्धही शतके ठोकली आहेत.

त्यामुळे तो एकाच वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक शतके करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने मार्क वॉ, सौरव गांगुली, मॅथ्यू हेडन आणि डेव्हिड वॉर्नर यांची बरोबरी केली आहे. हे चौघेही या यादीत प्रत्येकी 3 शतकांसह संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

एकाच वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक शतके करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर रोहित शर्मा असून त्याने 2019 साली 5 शतके ठोकली होती. तसेच दुसऱ्या क्रमांकावर असेलल्या कुमार संगकाराने 2015 वर्ल्डकपमध्ये 4 शतके केली होती.

दरम्यान, वनडे वर्ल्डकप 2021 स्पर्धेची अद्याप साखळी फेरी सुरु असल्याने डी कॉकला रोहित आणि संगकाराला या यादीत मागे टाकण्याचीही संधी आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की एकाच वर्ल्डकपमध्ये 2 किंवा त्यापेक्षा अधिक शतके करणारा डी कॉक एबी डिविलियर्स नंतरचा दक्षिण आफ्रिकेचा दुसराच खेळाडू आहे. डिविलियर्सने 2011 वर्ल्डकपमध्ये 2 शतके केली होती.

  • एकाच वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक शतके करणारे क्रिकेटपटू -

    • 5 शतके - रोहित शर्मा (2019)

    • 4 शतके - कुमार संगकारा (2015)

    • 3 शतके - मार्क वॉ (1996)

    • 3 शतके - सौरव गांगुली (2003)

    • 3 शतके - मॅथ्यू हेडन (2007)

    • 3 शतके - डेव्हिड वॉर्नर (2019)

    • 3 शतके - क्विंटन डी कॉक (2023)

Quinton de Kock Century
World Cup 2023: अफगाणिस्तान चेन्नईत बाजीगर! इंग्लंडनंतर पाकिस्तानलाही चारली पराभवाची धूळ

अमला, गिब्स, डू प्लेसिसला टाकले मागे

डी कॉकचे हे त्याच्या वनडे वर्ल्डकप कारकिर्दितीलही तिसरे शतक आहे. त्यामुळे तो आता वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

या यादीत अव्वल क्रमांकावर 4 शतकांसह एबी डिविलियर्स अव्वल क्रमांकावर आहे. डी कॉकने हर्षेल गिब्स, हाशिम आमला आणि फाफ डू प्लेसिस यांना मागे टाकले आहे. गिब्स, आमला आणि डू प्लेसिस यांनी वनडे वर्ल्डकपमध्ये प्रत्येकी 2 शतके केली आहेत.

यष्टीरक्षक म्हणूनही विक्रम

वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या यष्टीरक्षकांच्या यादीतही डी कॉक डिविलियर्स आणि ब्रेंडन टेलरला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत 5 शतकांसह कुमार संगकारा अव्वल क्रमांकावर आहे.

तसेच तो वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वोच्च खेळी करणारा यष्टीरक्षक ठरला आहे. त्याच्या या 174 धावांच्या खेळीने 2007 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ऍडम गिलख्रिस्टने केलेल्या 149 धावांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

  • वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक शतके करणारे यष्टीरक्षक

    • 5 शतके - कुमार संगकारा

    • 3 शतके - क्विंटन डी कॉक

    • 2 शतके - एबी डिविलियर्स

    • 2 शतके - ब्रेंडन टेलर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com