South Africa vs Australia Semi-Final 
क्रीडा

World Cup: सेमी-फायनल, 213 धावा अन् हार्टब्रेक! ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका सामन्यात इतिहासाची पुनरावृत्ती

South Africa vs Australia Semi-Final: गुरुवारी वर्ल्डकप 2023 स्पर्धेत झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याने अनेकांसाठी 1999 वर्ल्डकपमधील उपांत्य सामन्याच्या आठवणी ताज्या झाल्या.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023 South Africa vs Australia Semi Final:

गुरुवारी (16 नोव्हेंबर) कोलकातामधील ईडन गार्डन्स स्टेडियमवर वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना पार पडला. हा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्धल ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलियाने 3 विकेट्सने जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे.

दरम्यान सामन्याने अनेकांसाठी 1999 वर्ल्डकपमधील उपांत्य फेरीच्या आठवणी ताज्या झाल्या होत्या.

झाले असे की 1999 वर्ल्डकपमध्ये देखील ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत आमने-सामने आले होते. 17 जून रोजी बर्मिंगघमला झालेल्या त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करतान 49.2 षटकात 213 धावा केल्या होत्या.

ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार स्टीव्ह वॉ आणि मायकल बेवन यांनी अर्धशतके केली होती. तसेच शॉन पोलॉक यांनी 5 आणि ऍलन डोनाल्ड यांनी 4 विकेट्स घेतल्या होत्या.

त्यानंतर 214 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनेही 49.4 षटकात सर्वबाद 213 धावाच केल्या. जॅक कॅलिसने अर्धशतक केले होते, तर शेन वॉर्नने 4 विकेट्स घेतल्या होत्या.

हा सामना दोन्ही संघांनी 213 धावाच केल्याने बरोबरीत सुटला होता. पण तेव्हाच्या नियमानुसार सुपर सिक्स फेरीच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेपेक्षा वरच्या क्रमांकावर असल्याने ऑस्ट्रेलियाला अंतिम सामन्यात प्रवेश देण्यात आला, तर दक्षिण आफ्रिकेची मात्र निराशा झाली. या सामन्याबरोबरच दक्षिण आफ्रिकेचे अंतिम सामना खेळण्याची स्वप्नही भंगले.

या सामन्याच्या 24 वर्षांनंतर पुन्हा एकदा वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका आमने-सामने आले होते. विशेष म्हणजे या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 49.4 षटकातच सर्वबाद 212 धावा करत ऑस्ट्रेलियासमोर 213 धावांचे आव्हान ठेवले होते.

दक्षिण आफ्रिकेने उपांत्य सामन्यातच 213 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाला दिल्याने चाहत्यांना मात्र 1999 वर्ल्डकपचा अंतिम सामना आठवला. केवळ चाहत्यांनाच नाही, तर दक्षिण आफ्रिकेकडून 1999 साली उपांत्य सामना खेळलेल्या हर्षेल गिब्लनेही याबद्दल ट्वीट केले.

त्याने लिहिले की 'ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 213 धावा हव्या आहेत. आता धावांचा पाठलाग करण्याची त्यांची वेळ आहे. यापेक्षा चांगली स्क्रिप्ट लिहू शकत नाही.'

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने 213 धावांचे आव्हान 47.2 षटकात 7 विकेट्स गमावत 215 धावा करत पूर्ण केले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला पुन्हा एकदा अंतिम सामन्यात पोहचता आले नाही. त्यांचे पुन्हा एकदा वर्ल्डकप विजयाचे स्वप्न भंगले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: त्रिकोणी प्रेमाचा रक्तरंजित शेवट: गर्भवती महिलेची चाकूने वार करून हत्या, खुनी आधीचा लिव्ह-इन पार्टनर, नंतर पतीने खुनीचा काढला काटा

Horoscope: हा आठवडा आव्हानात्मक! 'या' 3 राशींसाठी कामावर सावधगिरी आवश्यक, अन्यथा नुकसानं पक्कं

"माझे वडील वाचले, कारण रवी नाईक!" - मंत्री विश्वजीत राणे भावूक; Watch Video

Narkasur in Goa: नरकासुराला 'सायलंट' ब्रेक! रात्री 12 नंतर संगीत वाजवण्यावर पोलिसांचे निर्बंध

Ravi Naik: रवींना 'मगो'चे नेतृत्व मिळाले असते तर...?

SCROLL FOR NEXT