South Africa Dainik Gomantak
क्रीडा

2023 ICC Cricket World Cup Qualifier Play-Off: आयर्लंड - बांगलादेश मॅच पावसात वाहिली अन् द. आफ्रिकेला मिळालं वर्ल्डकपचं डायरेक्ट तिकिट

दक्षिण आफ्रिकेनं आता भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये डायरेक्ट एन्ट्री मिळवली आहे.

Pranali Kodre

South Africa Direct qualified for World Cup 2023: बांगलादेशचा संघ सध्या युरोप दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील बांगलादेश विरुद्ध ऑयर्लंड यांच्यात होणारा तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला मोठा फायदा झाला आहे.

चेम्सफोर्डला झालेल्या बांगलादेश विरुद्ध ऑयर्लंड सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 246 धावा केल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या आयर्लंडने 3 बाद 65 धावा केल्या होत्या. पण त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. अखेर हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यामुळे आता भारतात यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या वर्ल्डकपसाठी दक्षिण आफ्रिका थेट पात्रता मिळवणारा आठवा आणि शेवटचा संघ ठरला आहे.

दक्षिण आफ्रिकेने काही दिवसांपूर्वीच नेदरलँड्सविरुद्ध वनडे मालिका जिंकली होती. त्यामुळे त्यांनी क्रिकेट वर्ल्डकप सुपर लीगच्या गुणतालिकेत वेस्ट इंडिजला आठवा क्रमांक मिळवत मागे टाकले होते. पण तरी आयर्लंडची बांगलादेशविरुद्धची वनडे मालिका बाकी असल्याने त्यांचे हे स्थान निश्चित झाले नव्हते.

जर आयर्लंडने बांगलादेश विरुद्ध वनडे मालिकेत 3-0 असा विजय मिळवला असता, तर त्यांचे आणि दक्षिण आफ्रिकेचे गुण सारखेच झाले असते. त्यामुळे नेटरनरेटचा विचार झाला असता. पण आता आयर्लंड - बांगलादेश यांच्यातील पहिलाच वनडे सामना पावसामुळे रद्द झाल्याने दक्षिण आफ्रिकेने त्यांचे आठवे स्थान पक्के केले आहे.

याबरोबरच दक्षिण आफ्रिका वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी थेट पात्रही ठरले आहेत. वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या थेट पात्रतेसाठी गेल्या तीन वर्षांपासून क्रिकेट वर्ल्डकप सुपर लीग स्पर्धा सुरू आहे. यामध्ये भारतीय संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे, पण यजमान असल्याने वर्ल्डकपसाठी यापूर्वीच थेट पात्र ठरला आहे.

याशिवाय न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि आता दक्षिण आफ्रिका या संघांनाही थेट पात्रता मिळवली आहे.

क्रिकेट वर्ल्डकप सुपर लीग स्पर्धेबद्दल...

वर्ल्डकप 2023 साठी थेट पात्रतेसाठी क्रिकेट वर्ल्डकप सुपर लीग स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेअंतर्गत क्रमवारीतील अव्वल 13 संघ गेल्या तीन वर्षांपासून वनडे मालिका खेळत आहेत. या स्पर्धेत गुणतालिकेत पहिल्या आठ क्रमांकावर राहणारे संघ वर्ल्डकप 2023 साठी थेट पात्र ठरणार होते.

तसेच उर्वरित 5 संघांना आणि आयसीसीच्या सहसदस्य संघांना वर्ल्डकपसाठी पात्रता फेरी खेळावी लागणार आहे. या पात्रता फेरीतून 2 संघ 2023 वर्ल्डकपसाठी पात्र ठरतील. त्यानंतर एकूण 10 संघात वर्ल्डकप 2023 स्पर्धा खेळवली जाणार आहे.

सध्या क्रिकेट वर्ल्डकप सुपर लीगच्या गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर 175 गुणांसह न्यूझीलंड आहे. त्यापाठोपाठ 155 गुणांसह इंग्लंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर भारत (139), बांगलादेश (135), पाकिस्तान(130), ऑस्ट्रेलिया (120), अफगाणिस्तान (115), दक्षिण आफ्रिका (98) हे संघ असून हे सर्व आठ संघ वर्ल्डकप 2023 साठी थेट पात्र ठरले आहेत.

पात्रता फेरी

आता वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील 8 संघ निश्चित झाले असल्याने उर्वरित संघ जून-जुलै दरम्यान झिम्बाब्वेमध्ये पात्रता फेरी खेळतील. पात्रता फेरीत वेस्ट इंडिज, श्रीलंका, झिम्बाब्वे, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, ओमान, नेपाळ, युएसए, युएई हे संघ खेळणार आहेत. यातील दोन संघ मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KL Rahul Century: लॉर्ड्सच्या मैदानावर राहुलची बादशाही, आशियात कुणालाच जमलं नाही ते करुन दाखवलं

Goa Tourism: पावसाळ्यातही गोव्यातील पर्यटन फुल्ल; बीचवर पर्यटकांची गर्दी

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Joe Root Record: क्रिकेटच्या देवाचा कसोटीतील महान विक्रम धोक्यात, जो रूट करणार राडा? आहे इतिहास रचण्याची संधी...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

SCROLL FOR NEXT