World Cup 2023 Schedule: ठरलं तर! भारत-पाकिस्तान 'या' दिवशी येणार आमने-सामने; इंग्लंड-न्यूझीलंडमध्ये पहिली मॅच

India vs Pakistan: भारतात यावर्षी रंगणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेच्या वेळापत्रकाबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
India vs Pakistan
India vs PakistanDainik Gomantak

World Cup 2023 Schedule: भारतात यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात वनडे वर्ल्डकप रंगणार आहे. हे वर्ल्डकपचे 13 वे पर्व असणार आहेत. दर चार वर्षांनी होणाऱ्या या वर्ल्डकपचे आत्तापर्यंत 12 वेळा यशस्वी आयोजन झाले आहे.

आता 13 व्या वर्ल्डकपच्या आयोजनाची जबाबदारी भारतावर आहे. दरम्यान, या वर्ल्डकपला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होऊ शकते.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने या स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होऊ शकते. तसेच 19 नोव्हेंबरला याच स्टेडियमवर अंतिम सामना पार पडेल.

तसेच सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारताचा या वर्ल्डकपमधील पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईमध्ये होऊ शकतो. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रविवारी, 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादला खेळवला जाऊ शकतो.

India vs Pakistan
World Cup 2023 साठी श्रीलंकेचं डायरेक्ट एन्ट्रीचं स्वप्न भंगलं! आता अशी मिळू शकते संधी

या वर्ल्डकपचे अधिकृत वेळापत्रक चालू आयपीएल हंगामानंतर बीसीसीआय जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तसेच क्रिकबझच्या अहवालात असेही स्पष्ट करण्यात आले आहे की आशिया चषकाबाबत अस्पष्टता असली तरी, पाकिस्तान वर्ल्डकप खेळण्यासाठी भारतात येणार आहे. पण तरीही काही चिंता व्यक्त केल्या जाऊ शकतात.

सध्याच्या संभाव्य वेळापत्रकानुसार पाकिस्तान अहमदाबाद, हैदराबाद, चेन्नई आणि बंगळुरूला सामने खेळण्याची दाट शक्यता आहे.

पाकिस्तानचे सर्वाधिक सामने दक्षिण विभागात आयोजित करण्याचा बीसीसीआय विचार करत आहे. तसेच अधिक सामने चेन्नईला खेळवले जाऊ शकतात. यामागे तेथील प्रेक्षकांकडून खिलाडूवृत्तीने प्रतिसाद मिळण्याची शक्यता जास्त आहे.

या वर्ल्डकपमधील सामने अहमदाबाद, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू याव्यतिरिक्त कोलकाता, दिल्ली, इंदूर, धरमशाला, गुवाहाटी, राजकोट, रायपूर आणि मुंबई या ठिकाणीही होऊ शकतात. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर उपांत्य सामना खेळवला जाऊ शकतो.

India vs Pakistan
ODI World Cup मधून बाहेर झाला, तरी जखमी विलियम्सन न्यूझीलंडसाठी निभावणार मोठी भूमिका?

या वर्ल्डकप स्पर्धेत साखळी फेरीत सर्व सहभागी 10 संघ एकमेकांविरुद्ध सामने खेळणार आहेत. म्हणजेच प्रत्येक संघ एकूण 9 सामने खेळणार आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणावर भारताचा किमान एक तरी सामना खेळला जाण्याची शक्यता आहे.

या स्पर्धेत 10 संघांमध्ये एकूण 48 सामने खेळले जाणार आहेत. वर्ल्डकप 2023 साठी यजमान भारतासह इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका हे संघ थेट पात्र ठरले आहेत. पण अजून दोन संघ पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत सहभागी होतील.

पात्रता फेरी झिम्बाब्वेमध्ये जून-जुलै दरम्यान खेळवली जाणार आहे. या पात्रता फेरीत वेस्ट इंडिज, श्रीलंका, नेदरलँड्स, आयर्लंड, नेपाळ, ओमान, स्कॉटलंड, युएई आणि झिम्ब्बावे हे संघ खेळताना दिसणार आहे. त्यांच्यातून दोन संघ ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या स्पर्धेसाठी पात्र ठरतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com