Mike Procter
Mike Procter X/ICC
क्रीडा

Mike Procter: क्रिकेटविश्वात हळहळ! 21 हजार धावा अन् 1400 विकेट्स घेणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज अष्टपैलूचे निधन

Pranali Kodre

South Africa Cricketer Mike Procter passed away:

दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज क्रिकेटपटू माईक प्रोक्टर यांचे शनिवारी (17 फेब्रुवारी) निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. डर्बनमध्ये हृदयाची शस्त्रक्रियेनंतरही खालावलेल्या प्रकृतीपुढे अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दक्षिण आफ्रिकेवर जवळपास तीन दशके लागलेल्या बंदीमुळे त्यांची आंतरराष्ट्रीय कारकिर्द मर्यादीत राहिली. तसेच त्या काळातील दक्षिण आफ्रिकेच्या अनेक प्रतिभाशाली क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य दाखवता आले नव्हते, त्यापैकी प्रोक्टर एक होते.

परंतु, त्यांनी दक्षिण आफ्रिकेसाठी खेळलेल्या अवघ्या 7 सामन्यांतही त्यांची क्षमता आणि कौशल्य दाखवून दिले होते. त्यांनी 1967 ते 1970 दरम्यान 7 कसोटीत 41 विकेट्स घेतल्या होत्या आणि 226 धावाही केल्या होत्या. त्यांनी हे सातही सामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळले.

विशेष म्हणजे त्यांनी खेळलेल्या 7 पैकी 6 सामन्यांत दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला, तर 1 सामना अनिर्णित राहिला.

दरम्यान, त्यांनी दक्षिण आफ्रिका क्रिकेटवर बंदी असताना 1968 ते 1981 दरम्यान इंग्लंडमधील ग्लुसेस्टरशायर काऊंटी संघाकडून 14 वर्षे क्रिकेट खेळले.

या संघाकडून 259 प्रथ श्रेणी सामने खेळताना त्यांनी 32 शतकांसह 14441 धावा केल्या आणि 833 विकेट्स घेतल्या. त्यांनी ऱ्होडिसिया आणि नताल संघाकडूनही काही सामने खेळले.

त्यांनी एकूण त्यांच्या कारकिर्दीत प्रथम श्रेणीचे 401 सामने खेळले, ज्यात त्यांनी 48 शतकांसह 21936 धावा केल्या आणि1417 विकेट्स घेतल्या. तसेच त्यांनी 271 लिस्ट ए सामन्यात 6624 धावा केल्या आहेत आणि 344 विकेट्स घेतल्या आहेत.

त्यांनी खेळाडू म्हणून कारकिर्द घडवल्यानंतर जेव्हा दक्षिण आफ्रिकेवरील बंदी उठवली, तेव्हा त्यांना दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक करण्यात आले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण आफ्रिकेने 1992 सालच्या वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.

त्यांनी 2002 ते 2008 दरम्यान आयसीसीचे सामनाधिकारी म्हणूनही काम पाहिली. 2008 मधील भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रसिद्ध कसोटी मालिकेतही ते सामनाधिकारी होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Update: लाटंबार्से पंचायतीत सत्ताबदल अटळ; आमदार चंद्रकात शेट्ये यांना मोठा धक्का

Margao: दिगंबर कामतांची चिंता वाढली; मडगावमध्ये सरदेसाईंचा 'जनता दरबार', शेकडो लोकांना मांडल्या समस्या

Goa Assembly Session: ST आरक्षणासाठी युरी आलेमाव अधिवेशनात आवाज उठवणार; 'अस्मिताय दिसा'सह 4 खाजगी ठराव

Goa News: कोलवा PSI ने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणीचा गुन्हा, पतीसह झाली होती अटक

Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT