

पणजी: राज्यातील घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची टंचाई आता हळूहळू कमी होत आहे. आज दिवसभरात १२ हजार ५६४ सिलिंडर वितरित करण्यात आले. दिवसअखेर २५ हजार ५३५ सिलिंडर शिल्लक होते. हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या तिन्ही कंपन्यांचे राज्यात ५५ वितरक आहेत. वाणिज्यिक वापरासाठी १९ किलोचा तर घरगुती वापरासाठी १४.२ किलोचा सिलिंडर दिला जातो. वाणिज्यिक वापराचे २ हजार ८८७ सिलिंडर राज्यात होते. आज त्यात ५४० सिलिंडरची भर पडली. त्यातील ४५७ सिलिंडर वितरित करण्यात आले. दिवसअखेर २ हजार ९६९ सिलिंडर शिल्लक होते.
घरगुती वापरासाठीचे २६ हजार १५४ सिलिंडर राज्यात आज सकाळी होते. दिवसभरात त्यात ११ हजार ९४५ सिलिंडरची भर पडली. दिवसभरात १२,५६४ सिलिंडर वितरित करण्यात आले. २५,५३५ सिलिंडर शिल्लक राहिले आहेत. फेब्रुवारी २०२६ महिन्यातील सरासरी दैनंदिन विक्री ११,२७४ घरगुती सिलिंडर इतकी होती. त्या तुलनेत सध्या उपलब्ध असलेला २५,५०० सिलिंडरचा साठा, साधारण २.२६ दिवसांसाठी पुरेसा असल्याचे स्पष्ट होते.
हिंदुस्तान पेट्रोलियमकडे वाणिज्यिक वापरासाठी २११ सिलिंडर होते. दिवसभरात ३७९ सिलिंडरची भर पडली. दिवसभरात ३७९ सिलिंडर वितरित केले. त्यामुळे दिवसअखेर २११ सिलिंडरचा साठा शिल्लक राहिला. घरगुती वापरासाठी १४,२२५ सिलिंडर सकाळी उपलब्ध होते. दिवसभरात त्यात ७,५३५ सिलिंडरची भर पडली. दिवसभरात ७,९५८ सिलिंडर वितरित केले. त्यामुळे दिवसअखेर १३,८०३ सिलिंडर शिल्लक होते.
भारत पेट्रोलियमकडे २,६२७ वाणिज्यिक वापराचे सिलिंडर होते. १६१ सिलिंडरची भर दिवसभरात पडली. दिवसभरात ५२ सिलिंडर वितरित केले. त्यामुळे दिवसअखेर २,७३६ सिलिंडर शिल्लक राहिले. घरगुती वापरासाठीचे १०,९२७ सिलिंडर सकाळी होते. दिवसभरात त्यात ४,०४९ सिलिंडरची भर पडली. दिवसभरात ४,१८३ सिलिंडर वितरित केले. त्यामुळे दिवसअखेर १०,७९३ सिलिंडरचा साठा शिल्लक राहिला.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडे वाणिज्यिक वापरासाठीचे ४९ सिलिंडर सकाळी होते. दिवसभरात २६ सिलिंडर वितरित केले. त्यामुळे दिवसअखेर २३ सिलिंडर शिल्लक राहिले. घरगुती वापरासाठी चे १,००१ सिलिंडर होते. दिवसभरात त्यात ३६० सिलिंडरची भर पडली. ४२३ सिलिंडर वितरित करण्यात आले, त्यामुळे दिवसअखेर ९३८ सिलिंडर शिल्लक राहिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.