Mohammad Nabi And Azmatullah Omarzai Performance Became Memorable Dainik Gomantak
क्रीडा

SL vs AFG: अफगाणिस्तानने पराभूत होऊनही रचला इतिहास, नबी-उमरझाई जोडीची करिष्माई खेळी

Mohammad Nabi And Azmatullah Omarzai: शुक्रवारी संध्याकाळी अफगाणिस्तान संघाची कामगिरी फारशी चांगली झाली नाही, पण त्यांच्या दोन खेळाडूंनी आपल्या कामगिरीने लाखो चाहत्यांची मने जिंकली.

Manish Jadhav

Mohammad Nabi And Azmatullah Omarzai Performance Became Memorable:

शुक्रवारी संध्याकाळी अफगाणिस्तान संघाची कामगिरी फारशी चांगली झाली नाही, पण त्यांच्या दोन खेळाडूंनी आपल्या कामगिरीने लाखो चाहत्यांची मने जिंकली. श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना शुक्रवार, 9 फेब्रुवारी रोजी पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला.

या सामन्यात दोन्ही संघांनी भरपूर धावा केल्या. पहिल्यांदा फलंदाजी करताना पथुम निसांकाच्या द्विशतकाच्या जोरावर श्रीलंकेने 381 धावा केल्या, तर अफगाणिस्तानने या धावसंख्येचा पाठलाग करताना मोहम्मद नबी आणि अजमातुल्ला उमरझाई यांच्या शतकी खेळीमुळे 6 गडी गमावून 339 धावा केल्या. अफगाणिस्तानने हा सामना 42 धावांनी गमावला असला तरी त्यांनी इतिहास नक्कीच रचला.

दरम्यान, श्रीलंकेने दिलेल्या 382 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एक वेळ अशी आली की पाहुण्यांचा निम्मा संघ अवघ्या 55 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. कर्णधार हशमतुल्ला शाहिदीसह अफगाणिस्तानच्या आघाडीच्या फळीने अवघ्या 8.3 षटकांत श्रीलंकेला शरणागती पत्करली होती, पण त्यानंतर मोहम्मद नबी आणि अजमतुल्ला उमरझाईने यांनी क्रिझवर अशी दाणादाण उडवली की, श्रीलंकेच्या खेळाडूंची पळताभुई थोडी झाली.

दुसरीकडे, मोहम्मद नबी (Mohammad Nabi) आणि अजमतुल्ला उमरझाई या दोन्ही फलंदाजांनी शतके झळकावली आणि 6व्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी करत संघाला इतक्या मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. मोहम्मद नबीने 130 चेंडूंत 15 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 136 धावा केल्या, तर 23 वर्षीय अजमतुल्ला उमरझाईने 115 चेंडूंत 13 चौकार आणि 6 गगनचुंबी षटकारांसह 149 धावा केल्या. उमरझाईने वनडे क्रिकेटमधील पहिल्या 150 धावा केवळ एका धावेने गमावल्या.

तसेच, मोहम्मद नबी आणि अजमतुल्ला उमरझाई यांच्या शतकांच्या जोरावर अफगाणिस्तानने इतिहास रचला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिले 5 विकेट गमावल्यानंतर अफगाणिस्तानने आता सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम केला आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने (Afghanistan) पहिले 5 विकेट पडल्यानंतर 284 धावा केल्या होत्या, तर याआधी हा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर होता, जेव्हा 2015 मध्ये त्यांनी श्रीलंकेविरुद्ध 267 धावा केल्या होत्या.

एकदिवसीय डावात 5वी विकेट गमावल्यानंतर सर्वाधिक धावा:

284 - अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका, 2024

267 - न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, 2015

259 - आशिया इलेव्हन विरुद्ध आफ्रिका इलेव्हन, 2007

252 - AfricaXI विरुद्ध AsiaXI, 2007

249 - भारत विरुद्ध झिम्बाब्वे, 1983

दरम्यान, मोहम्मद नबी आणि अजमतुल्ला उमरझाई यांच्यातील 242 धावांच्या भागीदारीने या सामन्यात अनेक विक्रमही रचले. ही भागीदारी एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील पराभवाची आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी आहे. त्याचवेळी, वनडे धावसंख्येचा पाठलाग करताना चौथ्या क्रमांकासाठीची ही आजपर्यंतची सर्वात मोठी भागीदारी आहे.

वनडे क्रिकेटच्या इतिहासातील पराभवातील सर्वात मोठी भागीदारी

242 - उमरझाई आणि नबी विरुद्ध श्रीलंका, 2024

235 - इजाज अहमद आणि अन्वर विरुद्ध भारत, 1998

230 - गिब्स आणि कर्स्टन विरुद्ध भारत, 1998

227 - ओ'ब्रायन आणि पोर्टरफिल्ड विरुद्ध केन, 2007

227 - झाद्रान आणि आर गुरबाज विरुद्ध पाक, 2023

एकदिवसीय सामन्यांमध्ये पाठलाग करताना चौथ्या किंवा त्या खालील नंबरवरील सर्वोच्च भागीदारी:

242 - उमरझाई आणि मोहम्मद नबी विरुद्ध श्रीलंका, 2024

226* - बोपारा आणि मॉर्गन विरुद्ध आयर्लंड, 2013

224 - महमुदुल्ला आणि शाकिब विरुद्ध न्यूझीलंड, 2017

223 - मोहम्मद अझरुद्दीन आणि जडेजा विरुद्ध श्रीलंका, 1997

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

SCROLL FOR NEXT