IND vs AFG, Video: जर विराट नसता, तर कदाचीत सुपर ओव्हर झालीच नसती, पाहा किंग कोहलीची अफलातून फिल्डिंग

Virat Kohli Fielding: अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात विराट कोहलीकडून शानदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले, त्याच्या क्षेत्ररक्षणाचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
Virat Kohli Fielding
Virat Kohli FieldingX/BCC and ICC

India vs Afghanistan 3rd T20I at Bengaluru, Virat Kohli Fielding:

बुधवारी (17 जानेवारी) बंगळुरुमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेला तिसरा टी20 सामना अत्यंत रोमांतक झाला. या सामन्यात दोन सुपर ओव्हर खेळवण्यात आल्यानंतर निकाल लागला. भारतीय संघाने दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवत सामना जिंकला.

दरम्यान या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले.

विराट फलंदाजीत कमाल करू शकला नाही, तो शुन्यावरच बाद झाला. मात्र क्षेत्ररक्षणात त्याने मोलाचे योगदान दिले. या सामन्यात भारताने प्रथम फलंजादाजी करताना 20 षटकात 4 बाद 212 धावा केल्या होत्या, तर अफगाणिस्ताननेही 213 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 6 बाद 212 धावा केल्या. त्यामुळे बरोबरी झाल्याने सुपर ओव्हर खेळवण्यात आली.

मात्र पहिल्या सुपर ओव्हरमध्येही 16-16 धावांसह बरोबरी झाली. त्यानंतर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताने 11 धावा केल्या. मात्र, अफगाणिस्तानला 12 धावांचा पाठलाग करताना 1 धावच करता आली. त्यांनी पहिल्या तीन चेंडूतच दोन्ही विकेट्स गमावल्या.

Virat Kohli Fielding
IND vs AFG: रोहित रिटायर्ड आऊट की रिटायर्ट हर्ट? चर्चेला उधाण; काय आहेत सुपर ओव्हरचे नियम?

दरम्यान, सामना बरोबरीत सुटण्यात विराटच्या क्षेत्ररक्षणाचाही वाटा राहिला. कदाचीत त्याने जर 17 व्या षटकात षटकार जाणारा चेंडू आडवला नसता, तर अफगाणिस्तान आधीच सामना जिंकू शकले असते.

झाले असे की 17 व्या षटकात अफगाणिस्तानकडून गुलबदीन नायब आणि करिम जनात फलंदाजी करत होते.यावेळी भारताकडून वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजी करत होता. त्याने टाकलेल्या या षटकाच्या पाचव्या चेंडूवर जनातने मोठा फटका खेळला. त्यावेळी असे वाटत होते तो चेंडू षटकारासाठी सहज जाईल.

मात्र बाऊंड्री लाईनजवळ विराटने हवेत उंच उडी मारत एका हाताने पकडला. मात्र तो चेंडू हातात ठेवून बाउंड्री लाईनच्या बाहेर राहणार नाही, हे लक्षात येताच त्याने लगेचच हवेत असतानाच तो चेंडू मैदानात फेकला. त्यानंतर विराट बाऊंड्री लाईनच्या बाहेर पडला. त्यामुळे षटकार जाणाऱ्या चेंडूवर अफगाणिस्तानला अवघी एकच धाव मिळाली.

इतकेच नाही, तर 19 व्या षटकात आवेश खानच्या गोलंदाजीवर नजीबुल्लाह झद्रानचाही त्याने अफलातून झेल घेतला. झद्राननेही मोठा फटका खेळला होता. मात्र लाँग ऑफपासून उजवीकडे पळत येत विराटने दोन्ही हाताने झेल घेतला. त्यामुळे नजीबुल्लाह 3 चेंडूत केवळ 5 धावा करून बाद झाला.

Virat Kohli Fielding
IND vs AFG: कॅप्टन रोहितचा धोनीच्या वर्चस्वाला धक्का! भारताचा ठरला सर्वात यशस्वी T20I कर्णधार

दरम्यान, त्यानंतरही गुलबदीन नायबने शानदार खेळ करत अफगाणिस्तानला विजयाच्या जवळ पोहचवले होते. अखेरच्या षटकात अफगाणिस्तानला विजयासाठी 19 धावांची गरज असताना नायबने अर्धशतक करत विजय मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.

अखेरच्या चेंडूवर 3 धावांची गरज असताना त्याला दोन धावाच पूर्ण करता आल्या. त्यामुळे हा सामना बरोबरी सुटला. त्यामुळे नंतर सामन्यात सुपर ओव्हर झाली.

दरम्यान, या सामन्यात भारताकडून कर्णधार रोहित शर्माने शानदार 121 धावांची नाबाद खेळी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com