Shubman Gill X/BCCI
क्रीडा

IND vs ENG: गिलने बनवला सुपर संडे! तब्बल 11 महिने अन् 12 डावांनंतर झळकावलं कसोटी शतक, पाहा Video

Shubman Gill Century: इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारताकडून दुसऱ्या डावात शुभमन गिलने शतकी खेळी केली.

Pranali Kodre

India vs England, 2nd Test Match at Visakhapatnam, Shubman Gill Century:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिका सुरू असून दुसरा सामना विशाखापट्टणमला खेळवला जात आहे. शुक्रवारपासून (2 फेब्रुवारी) सुरु झालेल्या या सामन्यात भारताकडून तिसऱ्या दिवशी 24 वर्षीय शुभमन गिलने शतकी खेळी केली आहे.

तिसऱ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावात रोहित शर्मा बाद झाल्यानंतर गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. तो सुरुवातीला बाद होण्यापासून थोडक्यात बचावला. पण याचा नंतर फायदा घेत त्याने काही अत्यंत चांगले शॉट्स खेळताना आक्रमक फलंदाजीही केली. त्यामुळे त्याने 60 चेंडूतच त्याचे अर्धशतक पूर्ण केले होते.

त्यानंतरही त्याने त्याच्या फलंदाजीची लय कायम ठेवली आणि डावाच्या 52 व्या षटकात चौथ्या चेंडूवर एकेरी धाव पळत शतकाला गवसणी घातली. त्याने 132 चेंडूत त्याचे शतक केले. हे गिलने 10 वे आंतरराष्ट्रीय शतक, तर तिसरे कसोटी शतक ठरले. त्याने शतकानंतर सेलिब्रेशनही केले.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून गिलच्या खराब कामगिरीवर टीका होत होती. त्याला गेल्या काही कसोटी सामन्यांमध्ये मोठी खेळी करता आली नव्हती. पण अखेर त्याने 11 महिन्यांनंतर आणि 12 डावांनंतर कसोटीत शतक केले आहे. गिलने यापूर्वी अखेरचे कसोटी शतक मार्च 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबादमध्ये केले होते.

तथापि, गिल शतकानंतर लगेचच बाद झाला. त्याला शोएब बशीरने चकवले. त्याने टाकलेल्या चेंडूवर गिलचा झेल यष्टीरक्षक बेन फोक्सने घेतला. गिलने 147 चेंडूत 104 धावांची खेळी केली.

या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 396 धावा केल्या होत्या. तसेच इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 253 धावांवर बाद झाला होता. त्यानंतल भारतीय संघ दुसऱ्याच दिवशी दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरला.

मात्र तिसऱ्या दिवशी सुरुवातीलाच जेम्स अँडरसनने रोहित शर्माला 13 धावांवर आणि यशस्वी जयस्वालला 17 धावांवर बाद केले. मात्र नंतर गिलने डाव सावरत शतक साजरे केले. त्यामुळे भारताला या सामन्यात 300 हून अधिक धावांची आघाडीही मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2025 चा दिमाखदार समारोप! रजनीकांत, रणवीरच्या उपस्थितीने लावले चार चांद, ‘स्किन ऑफ युथ’ला गोल्डन पिकॉक तर संतोष दवखर यांना 'गोंधळ'साठी 'रौप्य मयूर'

Goa Firing: सत्तरीतील पडोसे गावात पुन्हा गोळीबार! एकाला अटक, एअरगन आणि काडतुसे जप्त; वाळपई पोलिसांकडून पुढील तपास सुरु

PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

SCROLL FOR NEXT