ICC ODI Rankings: एकदिवसीय विश्वचषक 2023 ची धूम पाहायला मिळत असताना टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिलसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. टीम इंडियाचा 24 वर्षीय स्टार फलंदाज शुभमनने बाबर आझमची बादशाहत मोडीत काढली आहे. आयसीसी वनडे क्रमवारीत शुभमनने बाबर आझमला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे.
आयसीसीच्या ताज्या क्रमवारीनुसार, शुभमन गिल हा जगातील नंबर 1 वनडे फलंदाज बनला आहे. शुभमन गिल 830 रेटिंग गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर बाबर आझम 824 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. क्विंटन डी कॉक तिसऱ्या तर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे.
दरम्यान, बाबर आझम (Babar Azam) 950 दिवस वनडे क्रिकेटमध्ये नंबर 1 फलंदाज राहिला, पण आता शुभमन गिलने त्याला मागे टाकले आहे. टीम इंडियाचा प्रिन्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या शुभमनने गेल्या दोन वर्षात आक्रमक फलंदाजी करत धावांचा डोंगर उभारला. त्याच दरम्यान बाबर आझम सध्या फॉर्ममध्ये दिसत नाही. त्यामुळे त्याला आपले नंबर 1 चे स्थान गमवावे लागले.
शुभमन गिलने 41 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2136 धावा केल्या आहेत. त्याची फलंदाजीची सरासरी 61.02 आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे शुभमनचा स्ट्राईक रेट 100 पेक्षा जास्त आहे. गिलने 6 शतके आणि 11 अर्धशतके झळकावली आहेत.
दुसरीकडे, शुभमन गिलच्या वनडे करिअरची सुरुवात काही खास नव्हती. त्याने 2019 मध्ये पदार्पण केले आणि 2020 पर्यंत तो फक्त 3 सामने खेळू शकला. 2021 मध्ये त्याची वनडे संघात निवड झाली नव्हती. पण 2022 मध्ये शुभमन टीम इंडियात (Team India) परतला आणि त्याच वर्षी त्याने 12 सामन्यात 70.88 च्या सरासरीने 638 धावा केल्या.
गिलने एक शतक आणि 4 अर्धशतके झळकावली. 2023 मध्ये गिलने आश्चर्यकारक कामगिरी केली. आतापर्यंत त्याने 26 सामन्यात 63 च्या सरासरीने 1449 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 5 शतके आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. गिलने आपल्या बॅटने द्विशतकही ठोकले आहे. न्यूझीलंडविरुद्ध त्याने 208 धावांची विस्फोटक खेळी खेळली.
तसेच, शुभमन गिलला वनडे क्रमवारीत अव्वल स्थानावर राहायचे असेल, तर त्याला 2023 च्या विश्वचषकातील उर्वरित सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. तसे झाले नाही तर बाबर आझम पुन्हा नंबर 1 बनू शकतो कारण त्याच्या आणि गिलच्या रेटिंग गुणांमध्ये फारसा फरक नाही.
दुसरीकडे, 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे फलंदाज चमकदार कामगिरी करत आहेत. त्याचबरोबर गोलंदाजीतही भारतीय खेळाडूंची कामगिरी दिसून येत आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या वनडे क्रमवारीत मोहम्मद सिराज गोलंदाजीत अव्वल स्थानी पोहोचला आहे.
त्याच्याशिवाय, टॉप 10 मध्ये आणखी तीन भारतीय गोलंदाज आहेत. या यादीत कुलदीप यादव चौथ्या क्रमांकावर आहे. तर स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह 8 व्या स्थानावर पोहोचला आहे आणि 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत अवघ्या 4 सामन्यांमध्ये टीम इंडियाचा सर्वाधिक बळी घेणारा मोहम्मद शमी 10 व्या स्थानावर पोहोचला आहे.
रवींद्र जडेजानेही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच विकेट्स घेतल्या आहेत. गेल्या काही सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधूनही धावा आल्या आहेत. यासह भारताचे आता अव्वल 10 अष्टपैलू खेळाडूंमध्ये स्थान आहे. रवींद्र जडेजा दहाव्या स्थानावर पोहोचला आहे. टॉप 10 च्या या यादीत तो एकमेव भारतीय अष्टपैलू खेळाडू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.