ODI Ranking: रोहितने विराटला पहिल्यांदाच टाकलं मागे! वर्ल्डकपदरम्यान ICC ने जाहीर केली क्रमवारी

ICC ODI Ranking: वर्ल्डकप 2023 स्पर्धा सुरू असताना आयसीसीने बुधवारी ताजी वनडे क्रमवारी जाहीर केली आहे.
Rohit Sharma - Virat Kohli
Rohit Sharma - Virat Kohli
Published on
Updated on

Latest ICC ODI Cricket Rankings :

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा जोरदार सुरु असून प्रत्येक सामन्यात एखादा नवा हिरो समोर येत आहे. अशातच आयसीसीने बुधवारी (18 ऑक्टोबर) ताजी वनडे क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीनुसार भारताच्या रोहित शर्मासह क्विंटन डी कॉक, ट्रेंट बोल्ट यांना चांगलाच फायदा झाला आहे.

रोहितने भारतासाठी सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्याने या स्पर्धेतल आत्तापर्यंत एक शतक आणि अर्धशतक झळकावले आहे. त्यामुळे त्याने तब्बल 5 स्थानांची झेप घेत क्रमवारीत सहावा क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे त्याने या क्रमवारीत 8 व्या क्रमांकावरील विराट कोहलीला मागे टाकले आहे.

विशेष म्हणजे रोहितने वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजीच्या क्रमवारीत पहिल्यांदाच विराटला मागे टाकले आहे. दरम्यान, विराटही सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे तो एका स्थानाने वर आला असून आता 8 व्या क्रमांकावर आहे.

Rohit Sharma - Virat Kohli
IND vs PAK: अन् स्टेडियममध्ये पुन्हा घुमला 'सचिन...सचिन'चा गजर, ICC ने शेअर केला खास व्हिडिओ

तसेच डी कॉकने या स्पर्धेत सलग दोन शतके ठोकली होती. तसेच त्याने नंतर नेदरलँड्सविरुद्ध २० धावा केल्या. त्यामुळे आता तो तीन क्रमांकानी प्रगती करत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने त्याचाच संघसहकारी रस्सी वॅन डर द्युसेनला मागे टाकले आहे. द्युसेन चौथ्या क्रमांकावर आहे.

याशिवाय फलंदाजी क्रमवारी अफगाणिस्तानचा रेहमनुल्लाह गुरबाज 19 स्थानांची प्रगती करत 18 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तसेच नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड 16 स्थानांची झेप घेत 27 व्या क्रमांकावर आला आहे.

फलंदाजी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम कायम आहे, तसेच दुसऱ्या क्रमांकावर भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल कायम आहे.

गोलंदाजी क्रमवारी

वनडे वर्ल्डकपमध्ये ट्रेंट बोल्टनेही सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत नुकत्याच 200 वनडे विकेट्सही पूर्ण केल्या. त्यामुळे आता तो वनडे क्रमवारीत अव्वल क्रमांक पटकावण्यापासून अगदी जवळ आहे. तो 659 पाँइंट्ससह सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर असलेल्या जोश हेजलवूडचे 660 पाँइंट्स आहेत.

तसेच या क्रमवारीत अफगाणिस्ताचा फिरकीपटू राशिद खाननेही 2 स्थानांनी प्रगती करत चौथा क्रमांक मिळवला आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराज यानेही 7 स्थानांची झेप घेत मुजीब उर रेहमानसह 5 वा क्रमांक संयुक्तरित्या पटकावला आहे.

Rohit Sharma - Virat Kohli
Anil Kumble Birthday: फिरकीच्या बादशाहला चाहत्यांचा 'सलाम', World Cup मधील हे रेकॉर्ड पाहून तुम्हीही म्हणाल...

त्याचबरोबर जसप्रीत बुमराहनेही सात स्थानांची झेप घेतली आहे. त्यामुळे आता तो आणि कागिसो रबाडा संयुक्तरित्या 14 व्या क्रमांकावर आले आहेत. लुंगी एन्गिडीने 6 स्थान पुढे जात 16 वा क्रमांक मिळवला आहे.

दरम्यान, गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या 10 जणांमध्ये मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव हे भारतीय गोलंदाज आहेत. सिराज तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर कुलदीप 8 व्या क्रमांकावर आहे.

अष्टपैलू खेळाडूंमध्ये शाकिब अव्वल

अष्टपैलू खेळाडूंमध्ये सांगायचे झाले, तर बांगलादेशचा दिग्गज अष्टपैलू शाकिब अल हसन अव्वल क्रमांकावर कायम आहे. त्याने बांगलादेशसाठी यंदाच्या वर्ल्डकपमध्येही चांगली कामगिरी केली आहे.

तसेच न्यूझीलंडसाठी दमदार कामगिरी करणाऱ्या मिचेल सँटेनर याने आता अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत सहावा क्रमांक मिळवला आहे. ग्लेन मॅक्सवेल 8 व्या क्रमांकावर पोहचला आहे.

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर सिकंदर रझा आहे. या क्रमवारीत पहिल्या 10 मध्ये भारताचा केवळ हार्दिक पंड्या आहे. तो 9 व्या क्रमांकावर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com