ICC ODI Rankings: हार्दिक पांड्याला मोठा फटका, सिराज आणि कुलदीपचेही नुकसान; शाहीन आफ्रिदीची 'नंबर 1' वर झेप

ICC ODI Rankings: भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बांगलादेशविरुद्ध दुखापतीमुळे बाहेर पडला आहे.
Shaheen Shah Afridi
Shaheen Shah AfridiDainik Gomantak

ICC ODI Rankings: भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बांगलादेशविरुद्ध दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. दरम्यान, 1 नोव्हेंबर (बुधवार) रोजी आयसीसीने जारी केलेल्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत त्याचे मोठे नुकसान झाले आहे.

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत हार्दिक पहिल्या 10 मधून बाहेर पडला आहे. याशिवाय, भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनाही मोठा फटका बसला आहे. दरम्यान पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदीने आपली जादू दाखवत अव्वल स्थान पटकावले आहे.

आयसीसीची ताजी क्रमवारी

दरम्यान, आयसीसीने (ICC) जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत पहिल्या 10 फलंदाजांच्या यादीत कोणताही महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही. शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहित शर्मा पहिल्या दहामध्ये कायम आहेत. तर अव्वल 10 गोलंदाजांमध्ये मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक स्थान गमवावे लागले आहे.

सिराज दुसऱ्या वरुन तिसऱ्या तर कुलदीप सातव्या वरुन आठव्या स्थानावर पोहोचला आहे. शाहीन आफ्रिदीला वर्ल्डकपमध्ये उत्कृष्ट गोलंदाजीचा फायदा झाला आहे.

त्याने आठव्या क्रमांकावरुन थेट पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.ल क्रमवारीत जोश हेझलवूडला मागे टाकत तो आता जगातील नंबर 1 गोलंदाज बनला आहे.

Shaheen Shah Afridi
ODI Ranking: रोहितने विराटला पहिल्यांदाच टाकलं मागे! वर्ल्डकपदरम्यान ICC ने जाहीर केली क्रमवारी

शुभमन गिलपासून बाबर आझमला धोका

दुसरीकडे, फलंदाजांच्या क्रमवारीत शुभमन गिल आणि बाबर आझम (Babar Azam) यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे. आता बाबर आणि गिल यांच्यात केवळ 2 गुणांचा फरक आहे. मात्र, बाबर 818 रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर गिल 816 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत रोहित शर्मा पाचव्या तर विराट कोहली सातव्या स्थानावर आहे.

Shaheen Shah Afridi
ODI Ranking: भारताचा विजय, ऑस्ट्रेलियाचा पराभव, फायदा मात्र पाकिस्तानचा! ICC ची वनडे क्रमवारी जाहीर

तसेच, चालू विश्वचषकात भारतासाठी शानदार गोलंदाजी करणारा जसप्रीत बुमराह क्रमवारीत 11व्या स्थानावर आहे. तर मोहम्मद शमी 17 व्या स्थानावर आहे. या दोघांना येत्या काही दिवसांत मानांकन मिळू शकते.

तसेच टॉप 10 अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत एकही भारतीय खेळाडू नाही. हार्दिक आता 10व्या स्थानावरुन 11व्या स्थानावर पोहोचला आहे. तर रवींद्र जडेजा 13व्या स्थानावर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com