Shreyas Iyer Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022: श्रेयस अय्यर होणार कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार?

नुकतेच आयपीएलच्या (IPL) आगामी हंगामात लखनौ आणि अहमदाबाद संघांची एन्ट्री झाली आहे. त्यांचे 3-3 ड्राफ्ट खेळाडू ठरवले आहेत.

दैनिक गोमन्तक

IPL 2022 च्या मेगा लिलावाला अजून एक महिना बाकी आहे. परंतु त्याआधीच धक्कादायक बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. आताच आलेल्या बातमीनुसार, नुकतेच आयपीएलच्या आगामी हंगामात लखनौ आणि अहमदाबाद संघांची एन्ट्री झाली आहे. त्यांचे 3-3 ड्राफ्ट खेळाडू ठरवले आहेत. त्याच वेळी, कोलकाता नाइट रायडर्सने (Kolkata Knight Riders) देखील कर्णधार पदासाठी एक नाव निश्चित केले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोलकाता नाइट रायडर्सला 15 व्या सत्रात भारतीय युवा खेळाडूला कर्णधार बनवायचे आहे. वृत्तानुसार, या शर्यतीत श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आघाडीवर आहे. दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) कर्णधार असलेल्या श्रेयस अय्यरवर केकेआर मोठी गुंतवणूक करु शकते. दिल्ली कॅपिटल्सचे आणखी दोन माजी खेळाडू लखनौच्या नजरेत आहेत. रिपोर्ट्सनुसार, लखनौला मार्कस स्टॉइनिस (Marcus Stoinis) आणि कागिसो रबाडाला (Kagiso Rabada) त्यांच्या टीममध्ये समाविष्ट करायचे आहे. त्याचबरोबर या संघाचा कर्णधार म्हणून केएल राहुलचे नाव पुढे येत आहे.

अहमदाबाद फ्रँचायझीने संघाची कमान हार्दिक पांड्याकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई इंडियन्सचा हा माजी अष्टपैलू खेळाडू अहमदाबादचा कर्णधार असेल. त्याचवेळी राशिद खान आणि इशान किशन हे देखील अहमदाबाद संघात सामील होतील.

आयपीएल 2022 चा लिलाव फक्त बंगळुरुमध्येच होणार आहे. लिलावाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही, परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेगा लिलाव 11 ते 13 फेब्रुवारी दरम्यान होऊ शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

SCROLL FOR NEXT