IPL 2022 च्या मेगा लिलावापूर्वी मोठी बातमी समोर येत आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात नव्याने दोन टीम सामील झाल्या आहेत. यातच अहमदाबाद फ्रँचायझीने हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) या संघाची कमान सांभाळणार असल्याच्या बातम्या येत होत्या परंतु आता मीडिया रिपोर्ट्सनुसार अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) कर्णधार बनणार आहे. केवळ हार्दिकच नाही तर रशीद खानही अहमदाबाद फ्रँचायझीमध्ये सामील होणार आहे.
दरम्यान, हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) रिटेन केले नाही. पाठीच्या दुखापतीमुळे पांड्याला पूर्वीप्रमाणे गोलंदाजी करता येत नाही. त्याचबरोबर त्याचा फलंदाजीचा फॉर्म खराब होत आहे. या खराब फॉर्ममुळेच त्याला टीम इंडियातूनही (Team India) वगळण्यात आले होतं. तथापि, आयपीएल 2022 पूर्वी, अहमदाबाद फ्रँचायझीने (Ahmedabad Franchise) त्याच्यावर एक मोठी जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दिक पांड्याला 92 IPL सामन्यांचा अनुभव आहे. त्याने आयपीएलमध्ये (IPL 2022) 1476 धावा केल्या आहेत. पांड्याची सरासरी 27.33 आहे. हार्दिकला आयपीएलमधील सर्वोत्तम फिनिशरपैकी एक मानले जाते. याशिवाय पांड्याच्या नावावर 42 विकेट्स असून तो एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील आहे.
राशिद खानही अहमदाबादमध्ये सामील होणार
आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट लेग स्पिनर आणि मोठा सामना विजेता राशिद खान देखील अहमदाबाद संघात सामील होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अहमदाबादसोबत त्याच्या नावावर निश्चित झाली असून तो त्याच्या ड्राफ्ट प्लेयरचा एक भाग असणार आहे. रशीद खानला (Rashid Khan) सनरायझर्स हैदराबादसाठी कायम ठेवण्यास नकार दिला होता. राशिद खानचा आयपीएल रेकॉर्ड अप्रतिम आहे. या लेग-स्पिनरने 76 सामन्यांत 93 बळी घेतले असून इकॉनॉमी रेट प्रति षटक 6.33 धावा एवढा आहे.
इशान किशनही अहमदाबादचा भाग असणार
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई इंडियन्सचा आणखी एक खेळाडू अहमदाबाद जॉईन करणार आहे. यष्टिरक्षक इशान किशन अहमदाबाद फ्रँचायझीचा तिसरा ड्राफ्ट खेळाडू असू शकतो. इशान किशन हा यष्टिरक्षकासोबतच स्फोटक सलामीवीरही आहे. त्याला नुकतेच भारतीय संघातही स्थान मिळाले आहे. इशानने 61 आयपीएल सामन्यात 28.47 च्या सरासरीने 1452 धावा केल्या आहेत.
आयपीएलचे दोन नवे संघ अहमदाबाद आणि लखनऊ यांना त्यांच्या निवडलेल्या 3-3 खेळाडूंची नावे 31 जानेवारीपर्यंत द्यायची आहेत. याआधी ही तारीख 25 डिसेंबरपर्यंत होती. परंतु अहमदाबाद फ्रँचायझी असलेल्या CVC कॅपिटल्सशी करार वादानंतर ही तारीख वाढवण्यात आली. तसेच, CVC Capitals ला BCCI कडून क्लीन चिट मिळाली आहे आणि त्यांना लैटर ऑफ इंटेंट देखील देण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.