Shreyas Iyer Sister Dainik Gomantak
क्रीडा

Shreyas Iyer: राखी बांधतानाही श्रेयसची मस्ती, बहिणीनं शेअर केला स्पेशल Video

Raksha Bandhan: 'तुझ्यासारखा भाऊ मिळाल्याचा...', श्रेयस अय्यरच्या बहिणीनं शेअर केला स्पेशल व्हिडिओ.

Pranali Kodre

Shreyas Iyer Sister Shresta shares Spacial Raksha Bandhan Video:

भारतभरात 30 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे केले जात आहे. या सणाला भाऊ - बहिणीच्या नात्यातील प्रेम दाखवणारा सण म्हणून ओळखले जाते. या सणाला प्रत्येक भाऊ-बहीण एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करण्याबरोबरच एकमेकांच्या पाठीशी कायम उभे राहण्याचे वचनही देतात.

भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर आणि त्याची धाकटी बहिण श्रेष्ठा यांनीही रक्षाबंधन साजरे केले आहे. दरम्यान, श्रेयस सध्या भारतीय संघासह आशिया चषक खेळण्यासाठी श्रीलंकेला गेला आहे. पण असे असले तरी त्याला त्याची बहीण श्रेष्ठाने रक्षाबंधनाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

श्रेष्ठाने श्रेयसला राखी बांधतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. दरम्यान, त्यांनी श्रेयस श्रीलंकेला जाण्यापूर्वी रक्षाबंधन साजरे केल्याचा अंदाज या व्हिडिओवरून लावला जात आहे. कारण श्रेष्ठाने तिच्या कॅप्शनमध्ये ती श्रेयसला मिस करत असल्याचे म्हटले आहे.

व्हिडिओमध्ये दिसते की श्रेयस खुर्चीवर बसला असून श्रेष्ठा त्यांचे औक्षण करत आहे. यावेळी तो तिच्याबरोबर मस्तीही करताना दिसत आहे. तसेच ते दोघे एकमेकांना गोडही भरवतात.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये श्रेष्ठाने लिहिले आहे की 'श्रेयस रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. मला तू माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या वक्तींपैकी एक आहे, हे सांगून सुरुवात करायची आहे. मला तुझ्यासारखा भाऊ मिळाल्याचा अभिमान आहे, कारण फक्त तू जे काही मिळवले आहे इतकेच नाही, तर तू जसा आहेस त्यासाठीही.'

'माझ्यासाठी फक्त तूझा आनंद आणि यश महत्त्वाचे आहे. माझ्यासाठी नेहमीच उभा राहण्यासाठी धन्यवाद. तुझ्यापेक्षा चांगला भाऊ मी मागू शकत नाही. खूप प्रेम आणि मी तुला मिस करत आहे.'

श्रेष्ठा ही डान्सर असून ती कोरियोग्राफीही करते. ती अनेकदा सोशल मीडियावर तिच्या डान्सचे व्हिडिओ देखील शेअर करत असते. त्याचबरोबर श्रेयसबरोबरही एकत्र डान्स करताना तिने व्हिडिओ शेअर केले आहेत.

श्रेयस करणार पुनरागमन

दरम्यान, श्रेयस ३० ऑगस्टपासून सुरु झालेल्या आशिया चषकातून पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. त्याला २ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.

श्रेयस गेल्या अनेक महिन्यांपासून पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. त्यामुळे एप्रिल २०२३ मध्ये त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे त्याला बराच काळ क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते. मात्र, आता तो या दुखापतीतून सावरला असून पुनरागमनासाठी तयार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT