Shreyas Iyer
Shreyas IyerDainik Gomantak

Shreyas Iyer: अय्यरचा दिलदारपणा! गरिब चिमुकल्याला पाहाताच दाखवलं मोठं मन, पाहा Video

Shreyas Iyer Video: श्रेयस अय्यरने गरिब मुलांना पाहाताच त्यांना मदत करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
Published on

Shreyas Iyer help poor children: भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर सध्या दुखापतीतून सावरत आहे. तो गेल्या अनेक महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. याचदरम्यानचा त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की श्रेयस अय्यर कारमध्ये बसला आहे. त्याच्यासमोर एक गरिब व्यक्ती असून त्याच्या कडेवर लहान मुल आहे. यावेळी अय्यर मोठे मन दाखवत त्यांना पैसे दिले. त्याच्या या व्हिडिओवर अनेक कमेंट्स आल्या असून त्याचे अनेकांनी कौतुकही केले आहे.

Shreyas Iyer
Team India: T20 मालिकेपूर्वी बीसीसीआयने उचलले मोठे पाऊल, एक नाही तर...!

श्रेयसच्या पाठीवर शस्त्रक्रिया

श्रेयस गेल्या अनेक महिन्यांपासून पाठीच्या दुखापतीने त्रस्त होता. मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याच्या पाठीच्या दुखापतीने डोके वर काढले होते. त्यानंतर लगेचच त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे त्याला आयपीएल 2023 स्पर्धा, कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 अंतिम सामना, वेस्ट इंडिज दौरा अशा स्पर्धांना मुकावे लागले आहे.

दरम्यान, त्याने नेटमध्ये सरावाला सुरुवात केली आहे. त्यामुळे तो लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल अशी अपेक्षा भारतीय चाहत्यांना आहे. जर अय्यर येत्या काही दिवसात पूर्ण तंदुरुस्त झाला, तर तो वर्ल्डकप 2023 स्पर्धेत खेळताना दिसू शकतो.

खरंतर श्रेयस गेल्या काही काळापासून भारतासाठी वनडेत मधल्या फळीतील महत्त्वाचा खेळाडू ठरला आहे. त्याने गेल्यावर्षी वनडेत भारताकडून सर्वाधिक धावाही केलेल्या.

Shreyas Iyer
Asia Cup 2023: आशिया कपसाठी रवी शास्त्रींनी निवडली बेस्ट ऑफ द बेस्ट टीम इंडिया, 'या' मॅच विनर्सला...

श्रेयस अय्यरची कारकिर्द

श्रेयसने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 10 कसोटी सामने खेळले असून 16 डावात फलंदाजी करताना 1 शतक आणि 5 अर्धशतकांसह 666 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 42 वनडे सामने खेळले असून 46.60 च्या सरासरीने 2 शतके आणि 14 अर्धशतकांसह 1631 धावा केल्या आहेत.

त्याने 49 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 30.67 च्या सरासरीने 1043 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने आयपीएलमध्ये 101 सामन्यांमध्ये 19 अर्धशतकांसह 2776 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com