Shreyas Iyer श्रेष्ठाबरोबर थिरकला Tum-Tum गाण्यावर! पाहा भावा-बहिणीचा भन्नाट डान्स

Video: भारतीय संघाचा फलंदाज श्रेयस अय्यरने इंदोर कसोटीपूर्वी ट्रेंडिंग Tum Tum गाण्यावर बहिणीबरोबर डान्स केला आहे.
Shreyas Iyer Dance with Sister
Shreyas Iyer Dance with SisterDainik Gomantak
Published on
Updated on

Shreyas Iyer Dance with Sister: भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध इंदोरमध्ये 1 मार्चपासून तिसरा कसोटी सामना खेळायचा आहे. पण या दोन्ही संघातील दुसरा सामना तीन दिवसातच संपला होता. त्यामुळे खेळाडूंना विश्रांतीसाठी अधिक वेळ मिळाला होता. यादरम्यान अनेक खेळाडूंनी कुटुंबासोबत वेळ घालवण्यास प्राधान्य दिले.

याचदरम्यान श्रेयस अय्यरही बहिणीबरोबर मस्ती करताना दिसला आहे. नुकताच त्याने त्याची धाकटी बहिण श्रेष्ठाबरोबर डान्स करताना एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की तो श्रेष्ठाबरोबर सध्या ट्रेंडिंग असणारे 'टम-टम' या तमिळ गाण्यावर डान्स करत आहे. त्यांच्या या व्हिडिओला सध्या मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. हजारो चाहत्यांनी त्यांच्या डान्सच्या व्हिडिओला लाईक्सही दिले आहेत.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की श्रेष्ठा ही डान्सर असून ती कोरियोग्राफीही करते. ती अनेकदा सोशल मीडियावर तिच्या डान्सचे व्हिडिओ देखील शेअर करत असते. त्याचबरोबर श्रेयस आणि श्रेष्ठाने एकत्र डान्स करण्याची ही पहिली वेळ नाही. त्यांनी यापूर्वीही डान्सचे व्हिडिओ शेअर केले आहेत.

तसेच हे दोघेही अनेकदा मस्ती करतानाचे व्हिडिओ देखील शेअर करत असतात. त्यामुळे या भावा-बहिणीच्या जोडीला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रेम मिळत असते.

दुखापतीनंतर श्रेयसचे पुनरागमन

दरम्यान, श्रेयस अय्यरला जानेवारीमध्ये पाठीची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या मालिकांना मुकला होता. तसेच त्याचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातही खेळता आले नव्हते.

मात्र त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून भारतीय संघात पुनरागमन केले. पण पुनरागमनाच्या या सामन्यात त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले. तो या सामन्यात दोन्ही डावात मिळून 4 आणि 12 धावा करू शकला. तरी आता १ मार्चपासून इंदोरला होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत तो भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम राहण्याची शक्यता आहे.

श्रेयसने आत्तापर्यंत त्याच्या कारकिर्दीत 8 कसोटी सामन्यांत 640 धावा केल्या आहेत. तसेच 42 वनडेत 1631 धावा केल्या आहेत. याशिवाय तो 49 आंतरराष्ट्रीय टी20 सामनेही खेळला असून यामध्ये त्याने 1043 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com