Shikhar Dhawan Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: गंभीर-रहाणेच्या 'या' यादीत गब्बरची एन्ट्री, लाजिरवाणा रेकॉर्ड केला नावावर!

Shikhar Dhawan Record: इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या बुधवारी (18 मे) झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जचा 15 धावांनी पराभव केला.

Manish Jadhav

Shikhar Dhawan Record: इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या बुधवारी (18 मे) झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जचा 15 धावांनी पराभव केला.

मात्र, दिल्ली कॅपिटल्सचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर असल्याने या विजयाचा फायदा होणार नसून, या पराभवाने पंजाबच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे.

या सामन्यात शिखर धवनने असा विक्रम आपल्या नावावर केला, जो कोणत्याही खेळाडूला करायला आवडणार नाही.

धवनने हा लाजिरवाणा रेकॉर्ड आपल्या नावावर केला

या हंगामात पंजाब किंग्जचे (Punjab Kings) कर्णधार असलेला शिखर धवन दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खाते न उघडता बाद झाला. यासह, तो सलामीवीर म्हणून आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेल्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला.

धवन ओपनिंग करताना शून्यावर 10 वेळा बाद झाला आहे. या बाबतीत धवनने अजिंक्य रहाणे आणि गौतम गंभीरची बरोबरी केली. हे दोन्ही खेळाडू 10 वेळा खाते न उघडता बाद झाले आहेत, तर पार्थिव पटेल सर्वाधिक 11 वेळा शून्याचा बळी ठरला आहे.

दिल्ली कॅपिटल्सने हा सामना जिंकला

धरमशाला येथे खेळल्या गेलेल्या IPL-2023 च्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) पंजाब किंग्जचा 15 धावांनी पराभव केला. या पराभवामुळे पंजाब किंग्ज संघ आयपीएल-2023 मधून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.

प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेल्या दिल्ली संघाने निर्धारित 20 षटकांत 2 बाद 213 धावांची मोठी धावसंख्या उभारली. यानंतर पंजाब संघालाही 8 विकेट्सवर 198 धावा करता आल्या.

पंजाबच्या अडचणी वाढल्या

पंजाब किंग्जच्या या पराभवानंतर अडचणी वाढल्या आहेत. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील हा संघ आता 10 संघांच्या गुणतालिकेत 8 व्या क्रमांकावर आहे.

पंजाबचे 12 गुण आहेत. 13 सामन्यांत 5 वा विजय नोंदवल्यानंतर दिल्लीचे 10 गुण आहेत. पंजाबला अजून एक सामना बाकी आहे, मात्र तो जिंकूनही हा संघ इतर निकालांवर अवलंबून असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT