Shardul Thakur Century | Sai Kishore 5 wickets Haul X/BCCIDomestic
क्रीडा

Ranji Trophy: शार्दुलनं आक्रमक शतकासह, तर साई किशोरने 5 विकेट्सह विक्रम करत लुटली मैफल, पाहा Video

Shardul Thakur Century and Sai Kishore 5 wickets: रणजी ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात शार्दुल ठाकूरने शतक ठोकले, तर साई किशोरने 5 विकेट्स घेत सर्वांचे लक्ष वेधले.

Pranali Kodre

Shardul Thakur Century and Sai Kishore 5 wickets haul Video

रणजी ट्रॉफी 2023-24 स्पर्धा अखेरच्या टप्प्यात असून पासून शनिवारपासून (2 मार्च) उपांत्य फेरीला सुरुवात झाली आहे. या उपांत्य फेरीतील मुंबई विरुद्ध तमिळनाडू या सामन्यात दुसऱ्या दिवशी दोन खेळाडूंनी आपल्या कामिगिरीने सर्वांचेच लक्ष वेधले. हे दोन खेळाडू म्हणजे शार्दुल ठाकूर आणि आर साई किशोर.

2 मार्चपासून सुरू झालेल्या या सामन्यात तमिळनाडूचा पहिला डाव अवघ्या 146 धावांमध्ये संपला. त्यानंतर मुंबईचा संघ फलंदाजीला उतरला. यावेळी मुंबईला सुरुवातीला तमिळनाडूचा कर्णधार आर साई किशोरने मोठे धक्के दिले.

कुलदीप सेनने पृथ्वी शॉ याला 5 धावांवरच बाद केल्यानंतर साई किशोरच्या गोलंदाजीसमोर मुंबईची वरची आणि मधली फळी संघर्ष करताना दिसली.

साई किशोरने सलामीवीर भुपेन लवानी, नाईट वॉचमन मोहित अवस्थी, कर्णधार अजिंक्य रहाणे, हार्दिक तामोरे आणि मुशीर खान या प्रमुख फलंदाजांना बाद करत 5 विकेट्सही पूर्ण केल्या. त्याने नंतर अष्टपैलू शम्स मुलानीलाही त्रिफळाचीत केले.

याबरोबरच त्याने यंदाच्या रणजी हंगामात 50 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे तो एकाच रणजी हंगामात 50 हून अधिक विकेट्स घेणारा तमिळनाडूचा तिसराच गोलंदाज ठरला. यापूर्वी तमिळनाडूकडून एस वेंकटराघवन (1972-73) आणि आशिष कपूर (1999-00) यांनी एका रणजी हंगामात 50 विकेट्चा टप्पा गाठला होता.

दरम्यान, साई किशोरच्या गोलंदाजीमुळे मुंबई संघ अडचणीत सापडला होता. मुंबईने 106 धावांवरच 7 विकेट्स गमावल्या होत्या. परंतु 9 व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या शार्दुल ठाकूरने आक्रमक खेळताना डाव सावरण्याबरोबरच मुंबईला आघाडीही मिळवून दिली.

त्याने हार्दिक तामोरेबरोबर 100 धावांची, तर तनुष कोटीयनबरोबर 79 धावांची भागीदारी करताना त्याचे शतकही पूर्ण केले.

शार्दुलने 89 चेंडूत शतक केले. त्याने डावातील 81 व्या षटकात अजित रामच्या गोलंदाजीवर लाँग-ऑफला तो शतकानंतर 109 धावांवर बाद झाला. 104 चेंडूत केलेल्या या खेळीत त्याने 13 चौकार आणि 4 षटकार मारले. हे शार्दुलचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिलेच शतक ठरले.

दरम्यान, तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच मुंबईचा पहिला 106.5 षटकात 378 धावांवर संपला. त्यामुळे मुंबईला 232 धावांची आघाडी मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT