Ranji Trophy: मुंबईच्या पठ्ठ्यांचा पराक्रम! 10 अन् 11 व्या क्रमांकावर शतकं ठोकत 78 वर्षे जुन्या विक्रमाची पुनरावृत्ती

Tanush Kotian and Tushar Deshpande Century: रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळणाऱ्या तनुष कोटीयन आणि तुषार देशपांडे यांनी 10 आणि 11 व्या क्रमांकावर फलंदाजीला येत शतके ठोकण्याचा पराक्रम केला आहे.
Tanush Kotian - Tushar Deshpande scored century at Number 10 and 11 for Mumbai | Ranji Trophy 2023-24
Tanush Kotian - Tushar Deshpande scored century at Number 10 and 11 for Mumbai | Ranji Trophy 2023-24X
Published on
Updated on

Tanush Kotian - Tushar Deshpande scored century at Number 10 and 11 for Mumbai

रणजी ट्रॉफी 2023-24 स्पर्धेतील उपांत्य फेरीत मुंबई विरुद्ध बडोदा संघात सामना होत आहे. मुंबईतील शरद पवार क्रिकेट ऍकेडमी येथे होत असलेल्या या सामन्यात मुंबईच्या तुषार देशपांडे आणि तनुष कोटीयन यांनी मोठा पराक्रम केला आहे.

या सामन्यात मुंबईकडून दुसऱ्या डावात फलंदाजी करताना 10 व्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या तनुष कोटीयन आणि 11 व्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या तुषार देशपांडे यांनी शतकी खेळी केली आहे.

त्यांनी शेवटच्या विकेटसाठी तब्बल 232 धावांची भागीदारी करत मुंबईला 132 षटकात सर्वबाद 259 धावांपर्यंत पोहचवले. याबरोबर त्यांनी 78 वर्षांपूर्वीच्या विक्रमाची पुनरावृत्ती केली आहे.

Tanush Kotian - Tushar Deshpande scored century at Number 10 and 11 for Mumbai | Ranji Trophy 2023-24
Hanuma Vihari Post: 'कधीच आंध्रसाठी खेळणार नाही, राजकीय हस्तक्षेपामुळे सोडली कॅप्टन्सी', विहारीची खळबळजनक पोस्ट

प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात त्यांची दुसरीच जोडी ठरली आहे, ज्यांनी 10 आणि 11 व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरत शतके झळकावली आहेत. यापूर्वी असा कारनामा भारताच्याच चंदू सरवटे आणि शुते बॅनर्जी यांनी केला होता.

त्यांनी 1946 साली इंडियन्स संघाकडून सरेविरुद्ध खेळताना 10 आणि 11 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतके केली होती. सरवटे यांनी नाबाद 121 धावांची खेळी केली होती, तर बॅनर्जी यांनी 121 धावा केल्या होत्या.

दरम्यान, मुंबईकडून दुसऱ्या डावात 10 व्या क्रमांकावर उतरलेल्या तनुषने 129 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 120 धावा केल्या, तर 11 व्या क्रमांकावर उतरलेल्या तुषारने 129 चेंडूत 10 चौकार आणि 8 षटकारांसह 123 धावा केल्या.

Tanush Kotian - Tushar Deshpande scored century at Number 10 and 11 for Mumbai | Ranji Trophy 2023-24
Ranji Trophy 2023-24: अंतिम आठ संघ निश्चित! असे आहे उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक, जाणून घ्या कुठे पाहाणार सामने

तुषारला 132 व्या षटकात बाद करत निनाद रथवाने मुंबईचा हा डाव संपवला. परंतु तोपर्यंत मुंबईची धावसंख्या 569 धावांपर्यंत पोहचली होती.

त्यामुळे मुंबईने पहिल्या डावातील 36 धावांच्या आघाडीसह बडोद्याला 606 धावांचे आव्हान दिले. मुंबईकडून दुसऱ्या डावात सलामीवीर हार्दिक तोमरेनेही 114 धावांची शतकी खेळी केली होती. तसेच पृथ्वी शॉ याने 87 धावा केल्या होत्या. दरम्यान, या डावात बडोद्याकडून भार्गव भटने 7 विकेट्स घेतल्या.

तत्पुर्वी मुंबईने पहिल्या डावात 140.4 षटकात सर्वबाद 384 धावा केल्या होत्या. मुंबईकडून मुशीर खानने 203 धावांची द्विशतकी खेळी केली होती. पहिल्या डावातही भार्गव भटने 7 विकेट्स घेतल्या होत्या.

तसेच बडोद्याने पहिल्या डावात 110.3 षटकात सर्वबाद 348 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून कर्णधार विष्णू सोळंकी (136) आणि शाश्वत रावत (124) यांनी शतके केली होती. मुंबईकडून शम्स मुलानीने 4 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच या डावात तुषार आणि तनुष यांनी प्रत्येकी 2 विकेट्सही घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com