shane warne Dainik Gomantak
क्रीडा

Shane Warne Passes Away: शेन वॉर्न यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्नचे निधन झाले आहे.

दैनिक गोमन्तक

ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्नचे निधन झाले आहे. तो 52 वर्षांचा होता. ऑस्ट्रेलियन न्यूज चॅनल फॉक्स स्पोर्टच्या वृत्तानुसार, शेन वॉर्न थायलंडमध्ये होता. आणि तिथेच त्याचा अचानक संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला. शेन वॉर्नच्या व्यवस्थापन संस्थेच्या हवाल्याने फॉक्स स्पोर्टने एका निवेदनात म्हटले की, वॉर्न थायलंडमधील एका व्हिलामध्ये होता जिथे तो शनिवारी सकाळी (ऑस्ट्रेलियन वेळेनुसार) बेशुद्धावस्थेत आढळून आला होता, परंतु वैद्यकीय पथकाच्या सर्वतोपरी प्रयत्नांनंतरही तो शुद्धीवर येऊ शकला नाही. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे प्रथमदर्शनी समजत आहे. (Shane Warne dies of heart attack)

दरम्यान, शेन वॉर्नने 1992 मध्ये भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. पहिल्या कसोटीत त्याने केवळ 2 विकेट घेतल्या होत्या. मात्र त्यानंतर त्याला रोखणे कठीण झाले. प्रत्येक फलंदाज त्याच्या फिरकीच्या तालावर नाचत राहिला. त्याच्या जवळपास 16 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत, वॉर्न सर्वाधिक विकेट घेणार्‍यांपैकी एक होता. त्याने आपल्या 145 कसोटी कारकिर्दीत 708 विकेट्स घेतल्या. श्रीलंकेचा महान गोलंदाज मुथय्या मुरलीधरन ( 800 wickets) याच्या मागे दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज होता. त्याने 194 एकदिवसीय सामन्यांमध्ये 293 विकेट्स घेतल्या. 1999 च्या विश्वचषक फायनलमध्ये तो सामनावीर ठरला होता. आणि त्यावेळी त्याने संघाला विजेतेपदही मिळवून दिले होते.

एकाच दिवसात दोन दिग्गजांचा मृत्यू झाला

दुसरीकडे, 4 मार्च ऑस्ट्रेलियन संघासाठी खऱ्या अर्थाने काळा दिवस ठरला आहे. ऑस्ट्रेलियाने एकाच दिवसात आपले दोन महान दिग्गज गमावले आहेत. शुक्रवारी सकाळी माजी यष्टिरक्षक रॉडनी मार्श यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर संध्याकाळी उशिरा शेन वॉर्नच्या मृत्यूच्या बातमीने ऑस्ट्रेलियासह संपूर्ण क्रिकेट विश्व हादरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT