Shadab Khan
Shadab Khan Dainik Gomantak
क्रीडा

AFG Vs PAK: अफगाणिस्तानविरुद्ध पाकिस्तानने गमावली T20 सीरीज, शादाब म्हणाला- 'देशासाठी...'

Manish Jadhav

AFG Vs PAK: अफगाणिस्तानविरुद्धच्या 3 सामन्यांच्या T20I मालिकेत पाकिस्तानी संघाला 2-1 ने पराभव स्वीकारावा लागला आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतरच पाकिस्तान संघाने मालिका गमावली.

मात्र तिसऱ्या टी-20 सामन्यात त्यांनी अफगाणिस्तानला 66 धावांनी पराभूत करुन क्लीन स्वीप केला. हा सामना संपल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार शादाब खानने (Shadab Khan) मोठे वक्तव्य केले आहे.

सामन्यानंतर शादाब काय म्हणाला?

तिसरा T20 जिंकून अफगाणिस्तानला क्लीन स्वीप करण्यापासून रोखल्यानंतर पाकिस्तानचा स्टँड-इन कर्णधार शादाब खान म्हणाला की, 'संघाला पाकिस्तानच्या गौरवासाठी खेळायचे होते आणि आम्ही तेच केले.'

तिसऱ्या टी-20 सामन्यात पाकिस्तानने (Pakistan) 66 धावांनी विजय मिळवला. शादाबने 28 धावा करत तीन विकेट घेत विजयात मोलाचा वाटा उचलला. पहिले दोन सामने गमावूनही पाकिस्तानला विजयाने मालिका संपवायची होती, असे तो म्हणाला.

विजयासह मालिका संपवावी लागली

सामनावीर शादाबने सामन्यानंतर सांगितले की, 'आम्हाला मालिका विजयाने संपवायची होती आणि आम्ही तेच केले. आम्हाला परिस्थितीची सवय करुन घ्यावी लागली आणि आमचे फलंदाज ते करु शकले. आम्हाला पाकिस्तानच्या गौरवासाठी खेळायचे होते आणि आम्ही ते केले.'

तसेच, युवा खेळाडूंना संधी देणे हा या मालिकेचा मुख्य उद्देश होता. आशा आहे की, या सामन्यांमुळे त्यांना आत्मविश्वास मिळेल ज्याचा त्यांना दीर्घकाळात फायदा होईल, असेही तो म्हणाला. तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानला 18.4 षटकात 116 धावांत संपुष्टात आणल्यानंतर 182/7 अशी भक्कम धावसंख्या उभारली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: मडगाव येथे चपलांच्या दुकानाला आग

Smart City Panaji: उरले फक्त 18 दिवस! सांतिनेजमधील रस्‍ते पूर्ण होणार कधी?

Water Shortage : बट्टर,बोरीयाळ, तयडे, धारगेवासीयांचे पाण्यासाठी हाल; ग्रामस्थ संतप्त

Agonda Panchyat : आगोंद पंचायत क्षेत्रात भूमिगत वीजवाहिन्यांचे काम संथगतीने

Lairai Devi Jatra 2024 : हजारो भाविकांनी अनुभवले ‘अग्निदिव्य’; देवी लईराई जत्रोत्सव उत्साहात

SCROLL FOR NEXT