AFG vs PAK: अफगाणिस्तानने पाकिस्तानला T20I मॅचमध्ये चारली पराभवाची धूळ! आता मिशन व्हाईटवॉश

अफगाणिस्तानने पाकिस्तानला दुसऱ्या टी20 सामन्यात पराभूत करत इतिहास रचला आहे.
Afghanistan
Afghanistan Dainik Gomantak

Afghanistan vs Pakistan, 2nd T20I: रविवारी अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान संघात टी२० मालिकेतील दुसरा सामना शारजामध्ये पार पडला. या सामन्यात अफगाणिस्तानने 7 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह अफगाणिस्तानने तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. अफगाणिस्तासाठी हा पाकिस्तानविरुद्धचा ऐतिहासिक विजय होता.

अफगाणिस्तानासाठी हा पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलाच मालिका विजय ठरला आहे. यापूर्वी अफगाणिस्तानला पाकिस्तानविरुद्ध मालिका जिंकता आली नव्हती. आता अफगाणिस्तानला 27 मार्च रोजी होणाऱ्या तिसऱ्या टी20 सामना जिंकून पाकिस्तानला व्हाईटवॉश देण्याची संधी असणार आहे.

Afghanistan
PAK vs AFG: पाकिस्तान विरुद्ध पराभवानंतर अफगाणिस्तानी चाहत्यांचा स्टेडियमवर गोंधळ, Viral Video

रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानसमोर विजयासाठी 131 धावांचेच आव्हान ठेवले होते. रोमांचक झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने 19.1 षटकात 3 विकेट्स गमावत 133 धावा करत सामना जिंकला. याबरोबरच मालिकाही आपल्या नावावर केली.

अफगाणिस्तानकडून रेहमनतुल्लाह गुरबाजने सर्वाधिक 44 धावांची खेळी केली. तसेच इब्राहिम झारदानने ३८ धावांची खेळी केली. अखेरीस नजीबुल्लाह झारदान (23*) आणि मोहम्मद नबी (14*) यांनी काही आक्रमक फटके खेळत अफगाणिस्तानला विजय मिळवून दिला. पाकिस्तानकडून इहसानुल्ला आणि झमान खान यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Afghanistan
AFG vs PAK: अफगाणिस्तानने दाखवलं पाकिस्तानला आस्मान! 6 विकेट्सने टी20 मॅच जिंकत रचला इतिहास

तत्पूर्वी, या सामन्यात पाकिस्तानने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली होती. पण त्यांना मोठी धावसंख्या अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी उभारू दिली नाही. तरी पाकिस्तानकडून इमाद वासिमने अर्धशतकी खेळी केली.

तसेच त्याला शादाब खानने चांगली साथ दिली. त्यामुळे किमान पाकिस्तानला 20 षटकात 6 बाद 130 धावांपर्यंत पोहचता आले. इमाद वासिमने 57 चेंडूत नाबाद 64 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 3 चौकार 2 षटकार मारले. तसेच शादाब डावाच्या अखेरच्या चेंडूवर धावबाद झाला. त्याने 25 चेंडूत 32 धावांची खेळी केली.

अफगाणिस्तानकडून फझलहक फारुकीने शानदार गोलंदाजी करताना 4 षटकात 19 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. त्याने एक षटक निर्धाव देखील टाकले. तसेच नवीन उल हक, कर्णधार राशीद खान आणि करिम जनत यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com